संपूर्ण देश एका दिवसासाठी भाड्याने मिळतो, काय आहे ही योजना ?
एखादा देश भाड्याने मिळू शकतो का ? ही बातमी खरी आहे का देश कसा काय भाड्याने मिळू शकतो का ? काय ही योजना नेमकी ?

हो तुम्ही ऐकले ते खरे आहे. एक वेळ अशी होती, ज्यावेळी तुम्ही संपूर्ण ‘लिकटेंस्टीन’ हा देश एका दिवसासाठी भाड्याने घेऊ शकत होता ! साल २०१० मध्ये या छोट्या देशाने एक अनोखी मार्केटिंग योजना चालविली होती. ज्यात कोणताही व्यक्ती ७० हजार अमेरिकन डॉलर ( सुमारे ५८ लाख रुपये ) प्रति रात्र हिशेबाने देश भाड्याने घेऊ शकत होते. तेही किमान दोन रात्रीसाठी !
यात ९०० पाहुण्यांची थांबवण्याची व्यवस्था, ५०० हून जास्त बेडरुम आणि बाथरुमचा समावेश होता. खास बाब म्हणजे तुम्ही तुमच्या नावाचे साईनबोर्ड लावू शकत होता. तुमची करन्सी बनवू शकत होता. आणि एवढेच काय देशाचे प्रिन्स हान्स आदम द्वितीय यांच्या सोबत वाईन टेस्टींगची मजा देखील घेऊ शकत होता. चला तर या देशांसंदर्भात माहिती घेऊयात…
केवळ प्रोमोशनल इव्हेंट होता –
संपूर्ण देश भाड्याने देण्याची ही ऑफर केवळ एक प्रमोशनल इव्हेंट होता. परंतू हा छोटासा युरोपीय देश आज देखील इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौदर्याच्या शौकीनांसाठी कोणा एका स्वर्गाहून कमी नाही. आल्प्स पर्वतांच्या कुशीत वसलेला हा श्रीमंत देश आजही तेथी सुंदर निसर्ग आणि अनोख्या अनुभवांसाठी ओळखला जातो.
इतिहासाची आवड असणाऱ्यांनी वडूज कॅसलमध्ये अवश्य जायला हवे, हा किल्ला राजधानी वडूज शहराच्या वरील एका डोंगरात बनवलेला आहे. येथे लिकटेंस्टीनचे प्रिन्स यांचे अधिकृत निवासस्थान आहे. याचा अंतर्गत भाग सर्वसामान्य लोकांसाठी खोलत नाहीत. परंतू किल्ल्याच्या बाहेरुन शहर आणि आसपासच्या आल्प्स पर्वतांचा नजारा खुपच सुंदर दिसतो.

गुटेनबर्ग कॅसल पाहू शकता
वडूज कॅसल जरी सर्वसामान्य लोकांसाठी खुला नसला तरी लिकटेंस्टीनमध्ये आणखी एक सुंदर किल्ला आहे. जो तुम्ही पाहू शकता. त्या किल्ल्याचे नाव गुटेनबर्ग कॅसल. हा किल्ला आता एक म्युझियम आहे. लिकटेंस्टीनच्या पाच चांगल्या प्रकारे सुरक्षित किल्ल्यांपैकी एक. याची सुरुवात सुमारे ईसवी सन ११००० मध्ये झाली होती. येथे येणाऱ्या लोकांना गाईडेट टुरमध्ये सामील होत याचे अंगण, चर्च आणि रोझ गार्डन पाहू शकता.
शलून कॅसलमध्ये वाईन ट्राय करु शकता
जर तुम्हाला हायकिंग पसंद असेल तर शलून कॅसल ( ज्याला स्थानिक लोक ‘वाईल्डश्लॉस’ म्हणतात ) एक शानदार जागा आहे. आता हा देश खंडर झाला आहे. परंतू येथे तुम्ही पायी वा माऊंटन बाईकने सहज पोहचू शकता. वाईन आणि खाण्यापिण्याच्या शौकीनांसाठी ही जागा कोणा स्वर्गाहून कमी नाही.
प्रिन्स ऑफ लिकटेंस्टाईन वायनरी साल १३४८ मध्ये बनली होती, आज येथील Pinot Noir आणि Chardonnay वाईन जगभरात प्रसिद्ध आहे. येथे येणारे टुरिस्ट्स वाईन टेस्टींगचा मजा घेऊ शकतात आणि लिकटेंस्टाईन आणि ऑस्ट्रीया दोन्हीची वाईन ट्राय करु शकता.
रेस्तरांमध्येही जाऊ शकता
याच्या जवळच टॉर्कल रेस्तरां आहेय येथून तुम्ही आल्प्स पर्वतांचा नजारा पाहू शकता आणि तसेच लज्जतदार जेवण येथे मिळते. येथील मेन्यू स्थानिक वस्तूंपासून तयार होतो. टेरेसवर बसून तुम्ही डिनरचा एक रोमांटिक आणि लक्झरी अनुभव घेऊ शकता.

हे सर्व येथे राहून पाहू शकता
लिकटेंस्टीनच्या नैसर्गिक सौदर्य आणि आऊटडोर एक्टीव्हीटीजचा मजा घेण्यासाठी ही स्थळे जरूर पाहा
हायकिंग : जर तुम्हाला एडव्हेंचर पसंत आहे तर लिकटेंस्टीनला जरुर जावा. येथे अनेक सुंदर ट्रेकिंग ट्रेल्स आहेत. त्यात Historical Eschnerberg Trail सर्वात प्रसिद्ध आहे. हा रस्ता जंगल आणि गावातून जातो आणि देशाचे सौदर्य आणि इतिहास दाखवतो.
मालबुन स्की रिझॉर्ट: जर तुम्ही थंडीत येथे जात असला तर मालबुनला जरुर जा. ही जागा बर्फाने झाकलेल्या पर्वतांसह स्कीईंगचा शानदार अनुभव देते.
गामप्रिनर तलाव : हा लिकटेंस्टीन येथील एकमेव तलाव आहे , बेंडर्न-गामप्रिन गावात हा तलाव असून त्याच्या चारही बाजूंनी जंगल आहे. आणि पक्षी पाहण्यासाठी नेहमी लोक येथे येतात.
राईन नदीच्या किनाऱ्यावर सायक्लिंग: राईन नदीच्या जवळ सायकल चालवण्याचा शानदार अनुभव घेऊ शकता. आजूबाजूचे ग्रामीण परिसर देखील सुंदर आहे.
वडूज सिटी टूर – राजधानी वडूज तुम्ही पायी फिरून पाहा. हवे तर गाईड टूर देखील घेऊ शकता. येते तुम्हाला शहराचा इतिहास, वास्तूकला आणि संस्कृती संदर्भात माहिती मिळेल. येथील म्युझियम देशात इतिहास आणि नैसर्गिक वारसा सांगेल.
वडूज कॅथेड्रल: १९ व्या शतकातील हे सर्वात सुंदर चर्च त्याच्या निओ- गॉथिक वास्तुकला आणि रंगीत कांचाच्या खिडक्यांसाठी प्रसिद्ध आहे. वडजच्या मधोमध असल्याने या मिस करणे अशक्य
लिकटेंस्टाईन हा एक छोटासा देश आहे
लिकटेंस्टाईन हा एक छोटासा देश आहे. परंतू येथे फिरण्यासाठी खूप काही आहे. ही जागा एका छोट्या ट्रीपसाठी परफेक्ट आहे. तुम्ही दोन-तीन दिवसात तुम्ही टुरिस्ट स्पॉट देखील पाहू शकता. एका दिवसात तुम्ही खूप काही एक्सप्लोर करु शकता. येथे कोणताही एअरपोर्ट नाही. परंतू तुम्ही स्वित्झर्लंड वा ऑस्ट्रीयातून ट्रेन किंवा कारने येथे सहज पोहचू शकता.
