अमेरिका इराण युद्धादरम्यान मोठी बातमी; या देशाच्या संरक्षण मंत्र्याला स्फोटात उडवलं, अख्खं कुटुंबच संपलं
सध्या संपूर्ण जगच युद्धाचा आखाडा बनल्याचं पहायला मिळत आहे. मध्य पूर्वेत अमेरिका आणि इरामधील संघर्ष सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. सध्या संपूर्ण जगच युद्धाचा आखाडा बनल्याचं पहायला मिळत आहे. सध्या जगातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. तर काही देशांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस भीषण युद्ध झालं, या युद्धाची झळ फक्त या तीन देशांनाच बसली नाही तर या युद्धामुळे जगातील अनेक देशांचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही मध्य पूर्वेत प्रचंड तणाव आहे. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मालीचे संरक्षण मंत्री सादियो कॅमारा यांचा बंडखोरांनी त्यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. हा हल्ला एवढा भीषण होता की या हल्ल्यात सादियो यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन नातवंडांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेला सादियो यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मालीमध्ये सध्या गृहयुद्ध चांगलंच पेटलं आहे. मालीची राजधानी बमाकोमध्ये सैन्य आणि बंडखोर यांच्यामध्ये लढाई सुरू आहे. याचदरम्यान बमाकोमध्ये काही बंडखोरांकडून सादियो कॅमारा यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला, एका कार स्फोटामध्ये सादियो कॅमारा त्यांची दुसरी पत्नी आणि त्यांच्या दोन नातवंडाचा मृत्यू झाला आहे. बंडखोरांकडून मालीच्या इतर शहरांना देखील निशाणा बनवण्यात आलं असून, सध्या देशात अराजक निर्माण झालं आहे. दरम्यान बंडखोरांकडून मालीच्या अनेक सैन्य ठिकाणांवर देखील हल्ला करण्यात आला आहे, सैन्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांची जबाबदारी या बंडखोरांनी घेतली आहे.
बंडखोरांकडून मालीच्या संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी मोठा हल्ला करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात संरक्षण मंत्री सादियो कॅमारा त्यांची दुसरी पत्नी आणि त्यांच्या दोन नातवंडाचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या घरासमोर बंडखोरांकडून कारचा स्फोट घडवून आण्यात आला, याच स्फोटामध्ये त्यांचा मृत्यू झाला, तर या हल्ल्यामध्ये अनेक सैनिक आणि 16 सामान्य लोक देखील गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारपासून हिंसेला सुरुवात झाली असून, अजूनही बंडखोरांकडून हल्ले सुरूच आहेत.
