जगातील एक असं ठिकाण जेथे भरतो पैशांचा बाजार, रस्त्यांवर होतो नोटांचा व्यवसाय, Video Viral
जगात एक असं ठिकाण आहे, जेथे पैशांचा व्यवहार होतो आणि या देशात रस्त्याच्या कडेला अनेक जण पैशांचे बंडल घेऊन विक्रीसाठी बसलेले असतात. सध्या देशाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिावर व्हायरल होत आहेत.

रोज असंख्य अशा बातम्या समोर येतात ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण असतं. सोशल मीडियाच्या युगात इतर देशांबद्दल देखील अनेक गोष्टी सहज कळतात. जगात एक असा देश आहे जिथे फळं भाज्यांच्या जागी पैशांची खरेदी – विक्री होते… सोशल मीडियावर या पैशांच्या बाजाराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. ज्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही. पण ही सत्य परिस्थिती आहे.
जगातील असं एक देश ज्याची अर्थव्यवस्था फक्त आणि फक्त पर्यटनावर आधारलेली आहे…. येथे पूर्ण अर्थव्यवस्था कॅशलेस आहे. आपण उत्तर आफ्रिकेतील एडनच्या आखाताजवळ असलेल्या सोमालीलँडबद्दल सध्या चर्चा करत आहोत. सांगायचं झालं तर, हा देश 1991मध्ये सोमालियापासून वेगळा होऊन एक नवीन राष्ट्र स्थापन झाला. पण, इतर कोणत्याही देशाने अद्याप त्याला मान्यता दिलेली नाही. एका रिपोर्टनुसार, अंदाजे 40 लाख लोकसंख्या असलेला हा देश एक स्वायत्त प्रजासत्ताक असल्याचा दावा करतो.

सोमालीलँडची करेंसी शिलिंग आहे. ज्याची कोणत्याच देशात काहीच किंमत नाही. याच कारणामुळे हा देश प्रचंड गरीब आहे. या देशात एका अमेरिकन डॉलरची किंमत 9 हजार शिलिंगच्या नोटांइतकी आहे. सोमालीलँड शिलिंगच्या नोटा 500 आणि हजारांच्या मूल्यांमध्ये चलनात आहेत.
या प्रदेशाचा अर्धा भाग पूर्णपणे वाळूचा आहे, तर उर्वरित भाग अनेकदा दुष्काळग्रस्त असतो. उंट हे देशाचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत, तरीही देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. सर्वात खास या देशातील बाजार आहेत. लोक याठिकाणी फळं आणि भाज्यांच्या जागी नोटांची विक्री करताना दिसतील…
सोमालीलँडमध्ये तुम्हाला एक सिगारेट खरेदी करायची असेल तर, 500 ते 1 हजार रुपये शिलिंग गरजेचे आहे. तर एक पिशवी भाजी घेण्यासाठी पैशांनी भरलेली पिशवी तर हवीच… सोमालीलँडमध्ये तुम्हाला दागीन्यांची खरेदी करायची असेल तर, ट्रक भरुन पैशांची गरज तर नक्कीच भासेल… त्यामुळे येथील लोक कॅशलेस व्यवहार अधिक करतात.
View this post on Instagram
सोमालीलँड पूर्णपणे पर्यटनावर आधारलेला आहे. सोमालियामध्ये समुद्रकिनारे, रहस्यमय गुहा आणि जंगले आहेत. या क्षेत्रांवर संशोधन करण्यासाठी संशोधन करणारे विद्वान वारंवार सोमालियाला भेट देतात. शिवाय, या छोट्या देशात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. येथे लोक मासेमारी आणि लहान-मोठ्या नोकऱ्या करतात आणि भूक भागवतात.
