उतावळ्या नवऱ्यांचं गुडघ्याला बाशिंग, इथे नवरीलाच दिला जातोय हुंडा?, कारण वाचाल तर…

'ब्राइड प्राइस' ही चीनमधील एक परंपरा आहे ज्यामध्ये मुले लग्नाच्या वेळी मुलींना 'हुंडा' देतात. त्याला कैली असेही म्हणतात.

उतावळ्या नवऱ्यांचं गुडघ्याला बाशिंग, इथे नवरीलाच दिला जातोय हुंडा?, कारण वाचाल तर...
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 10:37 AM

बीजिंग : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीन (China) आता घटत्या लोकसंख्येने (population) हैराण झाला आहे. सातत्याने कमी होत असलेली लोकसंख्या वाढवण्यासाठी या देशात रोज नवनवीन कायदे (law) केले जात आहेत. अलीकडेच, चीन सरकारने आपल्या देशातील लोकांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी प्रवृत्त करून ‘ब्राइड प्राइस’ (bride price) ही परंपरा रद्द केली होती.

आता स्थानिक सरकारही महागड्या लग्नांविरोधात लोकांना जागरूक करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी अनेक पावले उचलत आहे. या जागरूकता मोहिमेचा एक भाग म्हणून, दक्षिणपूर्व चीनमधील दाइजियापू शहराच्या स्थानिक सरकारने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात 30 महिलांना एकत्र बोलावून त्यांना समोरासमोर बसवून लग्नादरम्यान ‘ब्राइड प्राइस’ ही परंपरा पाळणार नाही, अशी शपथ देण्यात आली. म्हणजेच ही परंपरा संपुष्टात येईल. अधिकाऱ्यांनी पुरावा म्हणून या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सह्याही घेतल्या.

स्थानिक सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या वेबसाइटवर या कार्यक्रमाबाबत नोटीसही जारी केली होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की लोक अशा मागासलेल्या प्रथा सोडून नवीन परंपरा सुरू करण्यासाठी आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षाही त्यामध्ये व्यक्त करण्यात आली होती.

कार्यक्रमामुळे नाराज झाली जनता

मात्र, या सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांची एकच खळबळ उडाली आहे. लोकांनी या कारवाईला महिलाविरोधी म्हटले आहे. हा प्रश्न सोडवण्याचा भार महिलांवर का पडला, असा सवाल त्यांनी केला. काही वापरकर्त्यांनी अशीही कॉमेंट केली होती की, अधिका-यांनी पुरुषांना विवाहात समानता कशी आणायची हे शिकवण्यासाठी अशाच बैठका घेतल्या पाहिजेत.

ब्राइड प्राईस म्हणजे काय ?

वास्तविक ‘ब्राइड प्राईस’ ही चीनमधील एक परंपरा आहे ज्यामध्ये मुलं लग्नाच्या वेळी मुलींना ‘हुंडा’ देतात. त्याला कैली असेही म्हणतात. याशिवाय चीनमधील लग्नाच्या प्रथा इतक्या किचकट आहेत की त्या पूर्ण होण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागतो. चीनमध्ये लग्नाची प्रक्रिया इतकी महाग आहे की लोकांच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट केवळ लग्नाचे विधी आणि परंपरांमध्ये खर्च केले जातात. चीनमधील वन चाइल्ड पॉलिसीनंतर महिलांची संख्या कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी आणखी पैशांची मागणी सुरू केली.

या परंपरेचा झाला विरोध

ब्राइड प्राईस या परंपरेला अनेकदा विरोधही झाला आहे. चीनचे सुशिक्षित लोक, विशेषत: शहरांमध्ये राहणारे, याकडे पितृसत्ताक अवशेष म्हणून पाहतात, ज्यामध्ये स्त्रियांना इतर घरांमध्ये विकली जाणारी मालमत्ता म्हणून पाहिले जात होते. ही प्रथा चीनच्या ग्रामीण भागात एवढी प्रचलित आहे की, अनेक गरीब कुटुंबांना लग्न करण्यासाठी अनेक वर्षांचे उत्पन्न वाचवावे लागते किंवा लग्न केले तर वर्षानुवर्षे कर्जबाजारी व्हावे लागते.

लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकारने उचलली ही पावले

या देशात अनेक ठिकाणी सरकारकडून अधिक मुलांना जन्म दिल्यास बक्षीस देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. विवाहित जोडप्यांना अधिक सुट्ट्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. याशिवाय लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मुलांची नोंदणीही सुरू करण्यात आली आहे.

चीनला कसली चिंता ?

खरंतर, चीनची लोकसंख्या अपेक्षेपेक्षा वेगाने कमी होऊ लागली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की 2023 पर्यंत भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल. वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2022 च्या अहवालानुसार, गेल्या 60 वर्षांत चीनचा राष्ट्रीय जन्मदर प्रति हजार 6.77 पर्यंत घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. या अहवालामुळे चीनची चिंता वाढली आहे कारण एकीकडे हा देश जगातील सर्वात मोठा अर्थव्यवस्थेचा देश होण्याचे स्वप्न पाहत आहे, तर दुसरीकडे घटत्या लोकसंख्येमुळे येथे काम करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.

काम करणारी म्हणजेच तरूणांची लोकसंख्या कमी झाली म्हणजे देशात आरोग्य व्यवस्था आणि पेन्शनचा भार वाढेल, पण उत्पादन मात्र कमी होत आहे. हे चीनच्या सर्वात मोठ्या चिंतेचे कारण आहे. या देशाची लोकसंख्या अशीच कमी होत राहिल्यास आगामी काळात चीनची अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते.

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.