AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार काय, एक लग्न करायलाही तयार नाहीत मुसलमान, सरकार देतेय 2 लाखांहून अधिक भत्ता

आपल्या येथे सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. परंतू एका देशात तरुण लग्न करायला तयार नाहीएत. या मुस्लीम देशात चार काय एक लग्न करायलाही तरुण राजी नाहीत. त्यामुळे सरकारला विविध प्रोत्साहन योजना आणाव्या लागत आहेत.

चार काय, एक लग्न करायलाही तयार नाहीत मुसलमान, सरकार देतेय 2 लाखांहून अधिक भत्ता
Muslims not ready to get married
| Updated on: Nov 17, 2025 | 11:31 PM
Share

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. तुम्हाला लग्नाचे आमंत्रण आली असतील, परंतू जगात एक असा देश आहे जेथील लोक लग्न करण्यास नाखुश आहेत. हा देश मुस्लीम असून येथे चार काय ? एक लग्न करण्याचे धाडस मुस्लीम तरुण करताना दिसत नाहीए. त्यामुळे या मुस्लीम देशातील लग्नाचा प्रमाण घटत चालले असून सरकारला यामुळे टेन्शन आले आहे. हळूहळू तरुणांना लग्नपासून दूर जात आहेत. त्यामुळे सरकारने लग्न करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखल्या आहेत.

2018 च्या आकडेवारीनुसार जगात कतार येथील मॅरेज रेट जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. ज्यानुसार दर 1,000 लोकसंख्ये मागे केवळ 1.4 विवाह झाले आहेत. Qatar Open Data नुसार देशात साल दर साल मॅरेज रेट घटत चालला आहे.घटता लग्न दर वाढवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

लग्न दर घटत आहे

PSA (Planning & Statistics Authority) , कतारच्या अधिकृत रिपोर्टच्यानुसार 2022 मध्ये कतरी (Qatari) लोकसंख्या ( 15 वर्षे आणि त्यावरील ) चा सामान्य विवाह दर पुरुषांसाठी: 19.7 प्रति 1,000 तर महिलांसाठी:17.1 प्रति 1,000 राहीला. कतारमध्ये तलाकची संख्या स्थिर राहिलेली नाही., परंतू कतारी लोकसंख्येत विवाह दर साल 2006 पासून सातत्याने घटत चालला आहे.तर 2010 मध्ये विवाह दर पुरुषांसाठी 24.3 प्रति 1,000 तर महिलांसाठी 23.5 प्रति 1,000 होता. तर 2011 मध्ये यात किरकोळ वाढ झाली. पुरुषांसाठी दर हजार पुरुषांमागे 25.1 आणि महिलांसाठी 24.1 इतका दर वाढला होता.

का घटत आहे लग्नाचा रेट?

दोहा न्यूजच्या 2015च्या लेखानुसार Qatar च्या Ministry of Planning Development and Statistics (MDSP) च्या मते लग्नाच्या संख्येत जी लागोपाठ घसरण दिसत आहे तिचे एक मुख्य कारण महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढणे हे आहे !

तर आणखी एक कारण म्हणजे कतारच्या हाय प्रोफाईल लग्नाची पद्धत. MDSP च्या तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की लग्नाला येत असलेल्या प्रचंड खर्च त्यामुळे लोक लग्न टाळत आहेत.

अल जझीराच्या एका लेखानुसार आकडेवारी हे ही सांगत आहे की कतारच्या महिला त्यांचा पहिले अपत्य अधिक वयात जन्माला घालत आहेत. त्यामुळे एकूण जन्मदर देखील घटला आहे.

सरकारने उचलली पावले

कतारमध्ये घटत्या मॅरेज रेटमुळे सरकारने पावले उचलली आहे. कतारने ऑक्टोबरच्या महिन्यापासून सिव्हील ह्यूमन रिसोर्सेज कायद्यात मोठ्या बदलाची घोषणा केली आहे. त्यात नवीन आर्थिक लाभाचा समावेश आहे. याचा उद्देश्य कुटुंबांना मजबूत करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे कामकाज चांगले करणे हा आहे.

2025 च्या कायद्याच्या क्रमांक 25 नुसार ज्याला शेख तमीम बिन हमद अल थानी यांनी जारी केले होते. त्यानुसार आता लग्न झालेल्या कपलना वेगवेगळा लग्न भत्ता मिळेल. आणि पती आणि पत्नीला वार्षिक 12,000 कतार रियाल म्हणजेच 2 लाख 92 हजार 300 मॅरेज इन्सेटिंव्ह देखील दिला जाईल.

या पावलाचा उद्देश चांगले कामकाजाचे वातावरण तयार करणे आणि कतारच्या लोकांना सरकारी नोकरीकडे आकर्षित करणे हा आहे.

महिलांना मेटरर्निटी लिव्ह

महिलांना तीन महिन्यांची भर पगारी मातृत्व रजा (Maternity Leave) दिली जात आहे. तसेच जुळी मुले आणि दिव्यांग मुलांसाठी ही रजा 6 महिन्यांची असेल. गर्भावस्थेच्या अखेरच्या वेळी महिलांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

जर पती – पत्नी दोन्ही सरकारी नोकरीत असतील तर त्यांना त्यांचा स्वतंत्र विवाह भत्ता मिळेल, तसेच तरुणांच्या मदतीसाठी वार्षिक मॅरेज इंसेन्टीव्ह देखील लागू केला जाईल. स्वतंत्र राहणाऱ्या पत्नींसाठी देखील हाऊसिंग भत्ता वाढवण्यात आला आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.