AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदूराष्ट्र आणि राजेशाहीच्या मागणीसाठी नेपाळमध्ये आंदोलन, विरोधी पक्षांचा पंतप्रधानांवर गंभीर आरोप

नेपाळमधील विद्यमान ओली सरकार राजेशाहीची मागणी करणाऱ्या आंदोलकांना समर्थन देत आहे, असा आरोप नेपाळी काँग्रेसने केला. (Nepal Opposition Oli Govt)

हिंदूराष्ट्र आणि राजेशाहीच्या मागणीसाठी नेपाळमध्ये आंदोलन, विरोधी पक्षांचा पंतप्रधानांवर गंभीर आरोप
| Updated on: Dec 15, 2020 | 10:55 AM
Share

काठमांडू: भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये आणखी एक वादळ उठलं आहे. नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करणे आणि राजेशाही व्यवस्था लागू व्हावी यासाठी काही संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनावरुन नेपाळच्या विरोधी पक्षांनी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्या वर आरोप केले आहेत. नेपाळमधील विद्यमान ओली सरकार आंदोलकांना समर्थन देत आहे, असा आरोप नेपाळी काँग्रेसने केला.  (Nepal opposition says Oli Govt supporting monarchy protest)

नेपाळमधील विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्यावर आरोप केले आहेत. ओली प्रदर्शकर्त्या आंदोलकांना समर्थन देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. केपी शर्मा ओली यांच्या मदतीशिवाय आंदोलक रस्त्यांवर उतरणे अशक्य आहे. केपी शर्मा ओली यांचे आंदोलकांना मूक समर्थन आहे, अशी टीकाही नेपाळी काँग्रेसनं केली. माजी पंतप्रधान आणि नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांनी मध्य नेपाळमधील हेटौडा येथे आयोजित प्रदर्शनात हा आरोप केला. (Nepal opposition says Oli Govt supporting monarchy protest)

2008 मध्ये राजेशाहीचा शेवट

नेपाळमधील जनतेच्या आंदोलनांनतर राजेशाही संपुष्ठात आणून 2008 पासून संविधानिक लोकशाहीपद्धतीचा स्वीकार केला होता. नेपाळनं 2008 मध्ये 240 वर्ष जूनी राजेशाही पद्धत रद्द करुन लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली होती. 2015 मध्ये नेपाळमध्ये नवे संविधान बनवण्यात आले. त्यानंतर देशाला लोकशाही संघराज्य प्रजासत्ताक देश घोषित केले गेले. संविधानानुसार 2017 मध्ये नेपाळमध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये नेपाळमधील मार्क्सवादी पक्ष सत्तेत आला. प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांनी हातामध्ये पृथ्वी नारायण शाह यांचे पोस्टर हाती घेतले होते. पृथ्वी नारायण शाह 18 व्या शतकातील आधुनिक नेपाळचे संस्थापक होते. (Nepal opposition says Oli Govt supporting monarchy protest)

हेटुडा, बुटवल, बिराटनगर, रौतहट, धनगढ़ी, नेपानगर, पोखरा, नवापुर, महेंद्रनगर, जनकपुर, बरदिया आणि बिरजगंज या शहरांमध्ये राजेशाही व्यवस्था लागू करावी आणि हिंदूराष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन होत आहे. राजेशाही व्यवस्था लागू करण्याची मागणी नेपाळच्या मातृभूमी समरसता नेपाळ, राष्ट्रीय शक्ती नेपाळ, बीर गोरखाली, गोरक्षा नेपाळ, विश्व हिंदू महासंघ, शैव सेना नेपाल, राष्ट्रीय सरोकार मंच, गोरक्षनाथ नेपाळ या संघटनांनी केली आहे. (Nepal opposition says Oli Govt supporting monarchy protest)

12 वर्षात 11 पंतप्रधान नेपाळमध्ये 2008 साली 240 वर्षांची राजेशाही संपून लोकशाही राज्य पद्धती सुरु झाली. यानंतर दोन वेळा नेपाळचं संविधान बदलण्यात आलं. नेपाळमध्ये पंतप्रधानांचा कार्यकाळ फारच कमी राहिल्याचे दिसून आले आहे. लोकशाही देश झाल्यानंतर नेपाळ मध्ये 12 वर्षात 11 पंतप्रधान झाले आहेत.

संबंधित बातम्या:

Happy Birthday Udit Narayan | नेपाळी चित्रपटसृष्टीपासून करिअरची सुरुवात, एका गाण्यामुळे उदित नारायणांचे नशीब चमकले!

‘रॉ’चे प्रमुख नेपाळमध्ये; देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी आणि पंतप्रधानांशी दोन तास गुप्त चर्चा

नेपाळ वठणीवर, संरक्षण मंत्र्यांना हटवलं, लष्करप्रमुख नरवणेंच्या दौऱ्यापूर्वी हालचाली

(Nepal opposition says Oli Govt supporting monarchy protest)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.