चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग नजरकैदेत? जिनपिंग यांना सेना अध्यक्षपदावरुनही हटवल्याची चर्चा

सिद्धेश सावंत

|

Updated on: Sep 25, 2022 | 7:31 AM

शी जिनपिंग यांच्या सुरु असलेली चर्चा खरी की खोटी? शी जिनपिंग नजरकैदेत असल्याचं वृत्त वाऱ्यासारखं का पसरलं?

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग नजरकैदेत? जिनपिंग यांना सेना अध्यक्षपदावरुनही हटवल्याची चर्चा
शी जिनपिंग
Image Credit source: TV9 Marathi

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्याबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे. सोशल मीडियामध्ये (Social Media) शी जिनपिंग यांच्याबाबत शंकास्पद पोस्ट केल्या जातायत. सोशल मीडियात करण्यात आलेल्या पोस्टनुसार, शी जिनपिंग यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं असल्याचं सांगितलं जातंय. नुकत्याच झालेल्या उझबेकिस्तानच्या समरकंद एससीओ समिटमध्ये जिनपिंग सहभागी झाले होते. तेव्हापासूनच त्यांना अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं असल्याची चर्चा आहे. पण चीनी कम्युनिस्ट पार्ट (China Communist Party) आणि चीनमधील सरकारी वृत्तसंस्थानी हे वृत्त फेटाळून लावलंय.

सोशल मीडियात जिनपिंग यांच्या नावे शेकडो पोस्ट करण्यात आल्यात. युजर्सनी केलेल्या पोस्टमध्ये जिनपिंग यांच्या नजरकैदेच्या वृत्ताबाबत सवाल करण्यात आलेत. मात्र याबाबतचं अधिकृत वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे ही अफवा असावी, अशी दाट शंकादेखील काही जणांनी व्यक्त केलीय.

हे सुद्धा वाचा

‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने जिनपिंग यांना राष्ट्रपती पदावरुन हटवलं. त्यानंतर सत्ता आपल्या हातात घेतलीय. आता कियाओमिंग हे चीनचे नवे राष्ट्रपती बनले आहेत’, अशा आशयाच्या पोस्ट ट्वीटर करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. पण या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. सुब्रम्हण्यम स्वामींनीही ट्वीट करत चीनवरुन सुरु झालेल्या चर्चेवरुन शंका घेतलीय.

दरम्यान, एका व्हिडीओही शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये चीनमधील सैन्य कूच करताना दिसून आलं आहे. सदर व्हिडीओ एका गाडीतून रेकॉर्ड करण्यात आला आहे. सैन्य दलाच्या गाडीतून हा व्हिडीओ काढण्यात आल्याचाही दावा केला जातोय. हा व्हिडीओ 22 सप्टेंबरचा असून यापासूनच जिनपिंग यांच्याबाबत अफवा पसरल्याचंही सांगितलं जातंय.

का उठली अफवा?

चीनमध्ये नुकतीच दोघा माजी मंत्र्यांना आणि चार अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा सुनावण्यात आलेले सर्व आरोपी हे एका राजकीय गटाचा भाग होते, असं सांगितलं जातंय. सध्या भ्रष्टाचाराविरोधी मोहीम चीनमध्ये राबवली जातेय. शिक्षा सुनावलेले सहा जण हे जिनपिंग यांच्या विरोधातील होते. त्यामुळे विरोधकांकडूनच जिनपिंग यांच्याबाबत उलटसुलट अफवा पसरवल्या जात असल्याचाही अंदाज काही जाणकारांनी वर्तवलाय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI