AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका आणि पाकिस्तानमधील वाद पेटला, थेट फेटाळला तो दावा, आता डोनाल्ड ट्रम्प..

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचण्यांबद्दल अत्यंत मोठा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर जगात एकच खळबळ उडाली.

अमेरिका आणि पाकिस्तानमधील वाद पेटला, थेट फेटाळला तो दावा, आता डोनाल्ड ट्रम्प..
Donald Trump Pakistan
| Updated on: Nov 04, 2025 | 12:41 PM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर जगात एकच खळबल उडाली. पाकिस्तान, चीन आणि उत्तर कोरिया अण्वस्त्रांच्या चाचण्या गुप्तपणे करत असल्याचे त्यांनी म्हटले. हेच नाही तर त्यांनी देखील अण्वस्त्रांच्या चाचण्या करण्याचे आदेश दिले. संपूर्ण जग हे करत आहे, मग आपण कशाला मागे राहायचे असे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसह पाकिस्तानचे नाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली. थोडक्यात काय तर भारताच्या शेजारी दोन्ही देश अण्वस्त्राच्या चाचण्या करत आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. अत्यंत दाव्याने बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. चीन आणि पाकिस्तान अण्वस्त्राच्या चाचण्या करत असल्याने भारताने देखील सावध भूमिका घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगत पाकिस्तानने तो फेटाळून लावलाय. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सीबीएस न्यूजवर याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, अणुचाचण्या करणारा पाकिस्तान हा पहिला देश नाहीये. अण्वस्त्र चाचण्या करणारा पाकिस्तान पहिला देश नसणार आहे, याची खात्री मला असल्याचेही त्यांनी म्हटले. या चाचण्यांमुळे पाकिस्तानात अनेकदा भूकंप झाल्याचाही दावा केला जातो.

पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांचा देश नियमांविरुद्ध कोणत्याही चाचण्या करणार नाही. पाकिस्तानने म्हटले आहे की त्यांनी चाचणी बंदी करार (CTBT) वर सही केलेली नाहीये. CTBT वर स्वाक्षरी करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका देखील समाविष्ट आहे. मात्र, पाकिस्तानने म्हटले की, आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन कोणतीही चाचणी करत नाही. मग प्रश्न पडतो की, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोटा आहे का?

पाकिस्तानने स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. पाकिस्तानने 1998 मध्ये अणुचाचणी केली, असल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, पाकिस्तानचे एक क्षेत्र असे आहे की, तिथे नेहमीच भूकंप येत राहतो आणि त्याच भागात पाकिस्तान वारंवार अणुचाचण्या करत असल्याचे सांगितले जाते. भारतासाठी खरोखरच ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा असून भारत यावर काय मार्ग काढतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी.
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका.
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण.
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला.
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे.