China-Taiwan Tension: नेम चुकला! चीनने तैवानवर डागलेले मिसाईलने जापानवर पडले

चीनचे तैवानवर 11 मिसाईलने हल्ला केला आहे. मात्र, यातील पाच मिसाईल जापानमध्ये(Japan) पडली आहेत. जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. चीनने डागलेली पाच क्षेपणास्त्रे जपानच्या हद्दीत पडल्याचे त्यांनी सांगीतले.

China-Taiwan Tension: नेम चुकला! चीनने तैवानवर डागलेले मिसाईलने जापानवर पडले
वनिता कांबळे

|

Aug 04, 2022 | 7:37 PM

बीजिंग : चीन आणि तैवान मधील संघर्ष(China-Taiwan Tension) चांगलाच पेटला आहे. चीनचे तैवानवर 11 मिसाईलने हल्ला केला आहे. मात्र, यातील पाच मिसाईल जापानमध्ये(Japan) पडली आहेत. जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. चीनने डागलेली पाच क्षेपणास्त्रे जपानच्या हद्दीत पडल्याचे त्यांनी सांगीतले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. याचा थेट देशाच्या सुरक्षेशी संबंध असून लोकांच्या सुरक्षेशी आम्ही तडजोड करू शकत नाही असा इशारा जपानने चीनला दिला आहे.

गुरुवारी चीनने आक्रमक पवित्रा घेत तैवानच्या समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. तसेच लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैनात केल्या. शिवाय तैवानभोवती आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव देखील चीनने सुरु केला आहे. यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनची आगपाखड झाली आहे.

चीनने तैवानवर 11 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मागील अनेक वर्षांमध्ये तैवानला भेट देणाऱ्या पेलोसी एकमेव हायप्रोफाईल यूएस अधिकारी आहे. त्यांनी धमक्यांकडे दुर्लक्ष करत तैवानला भेट दिली. त्याला प्रत्युत्तर म्हणून, चीनने तैवानच्या आजूबाजूच्या अनेक झोनमध्ये सरावांची मालिका सुरू केली.

चीनने केलेले हे हल्ले जगातील सर्वात व्यस्त शिपिंग लेन असलेल्या किनाऱ्यापासून केवळ 20 किमी अंतरावर करण्यात आले आहेत. दरम्यान, क्षेपणास्त्रांची अचूकता आणि शत्रूला एखाद्या भागात प्रवेश किंवा नियंत्रण नाकारणे हाच या हल्ल्यामागचा उद्देश होता, असे ईस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते वरिष्ठ कर्नल शी यी यांनी सांगीतले.

तैवान आणि अमेरिकाही तयारीत

दुसरीकडे चीनचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका आणि तैवानचे सैन्यही तयारीत असल्याची माहिती आहे. अमेरिका नेव्हीच्या ४ वॉरशिप हाय अलर्टवर तैनात ठेवण्यात आलेले आहेत. तसेच तैवानच्या समुद्री सीमेत त्या गस्त घालीत आहेत. या वॉरशिपवर एफ-१६, एफ ३५ सारखे अत्याधुनिक फायटर जेट्स आणि मिसाईल्स तैनात आहेत. जर चीनने काही कागाळी केली तर अमेरिका आणि तैवान दोन्ही बाजूंनी चीनवर हल्ला करण्याची शक्यता आहे.

चीननेही सज्ज ठेवलीत शस्त्रास्त्रे

चीननेही तयारी केली असून कारवाईसाठी लाँग रेंज हुडोंग रॉकेट आणि रणगाडे तयार ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर तैवानमध्येही चीनचे लष्करी तळ आहेत. त्यांचाही वापर केला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकन सैन्याचेही चिनी सैन्यांच्या हालचालींवर नजर आहे.

अमेरिकी सैन्य तैवानमध्ये

माध्यमांतून आलेल्या काही बातम्यांनुसार, पेलोसी यांच्या दौऱ्याआधीच काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे काही सैनिक आणि मिलिट्रीचे टेक्निकल एक्सपर्ट तैवानला पोहचलेले आहेत. मिलिटरीत या तयारीला बूट ऑन ग्राऊंड असे संबोधण्यात येते. दक्षिण चीन समुद्र परिसरात आणि तैवानमध्ये चीनच्या दादागिरीला रोखायचेच, असा पवित्रा आता अमेरिकेने घेतलेला आहे. तैवानमध्ये अमेरिकेचे सैनिक आहेत की नाहीत, याचा खुलासा अद्याप अमेरिकेने केलेला नाही. याबाबत पेंटागनच्या प्रवक्त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे.

तैवानवरुन का आहे तणातणी

चीन वन चायना धोरणानुसार तैवानला आपला प्रदेश मानतो. तर दुसरीकडे तैवान स्वताला स्वतंत्र देश म्हणवून घेतो आहे. तैवानने चीनच्या राजकीय मागण्यांसमोर झुकावे आणि चीनचा कब्जा मानावा, यासाठी चीन तैवानवर दबाव टाकीत आहे. दुसरीकडे अमेरिका चीनच्या वन चायना धोरणाला मानते, मात्र त्यात तैवान नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें