मोदींच्या मैत्रीचा फायदा नाहीच, ट्रम्प यांना अमेरिकेतील केवळ 22 टक्के भारतीयांचा पाठिंबा : सर्व्हे

अमेरिकन भारतीयांपैकी जवळपास 78 टक्के भारतीयांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नापसंती दाखवत जो बाईडन यांना पसंती दिली आहे.

मोदींच्या मैत्रीचा फायदा नाहीच, ट्रम्प यांना अमेरिकेतील केवळ 22 टक्के भारतीयांचा पाठिंबा : सर्व्हे
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 4:29 PM

वॉशिंग्टन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक (President Election) होत आहे. त्यामुळे प्रचाराच्या तोफा चांगल्याच गरम आहेत. यावेळी राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिपब्लिक पार्टीकडून डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि डेमोक्रेट पार्टीकडून जो बाईडन (Joe Biden) निवडणूक रिंगणात आहे. यावर नुकताच एक निवडणूकपूर्व सर्व्हे (Election Survey) करून मतदारांचा कल समजून घेण्याचा प्रयत्न झाला. यात एक मोठी बाब समोर आली आहे. अमेरिकन भारतीयांपैकी जवळपास 78 टक्के भारतीयांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नापसंती दाखवत जो बाईडन यांना पसंती दिली आहे. केवळ 22 टक्के लोकांनी ट्रम्प यांना मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली (Only 22 percent of NRI like to vote Donald Trump in US Presidential Election).

कॉरनेगी इंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस, जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलवेनिया यांनी संयुक्तपणे बुधवारी (14 ऑक्टोबर) हा सर्व्हे प्रकाशित केला. यात अर्ध्यापेक्षा अधिक भारतीय अमेरिकन नागरिकांपैकी (Indian Americans) केवळ 22 टक्के नागरिकांनी ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यास पसंती दिली. उर्वरित 78 टक्के भारतीय अमेरिकन आपलं मतदान जो बाईडन यांना देत आहेत.

सर्वेक्षणात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ट्रम्प यांना मतदान करणाऱ्या भारतीय अमेरिकन नागरिकांपैकी 76 टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत सकारात्मक आहेत. तर डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बाईडन यांना मतदान देणाऱ्यांपैकी 52 टक्के भारतीय अमेरिकन मोदींबाबत सकारात्मक आहेत. यातून ट्रम्प समर्थक मतदारांमध्ये मोदी समर्थकांचं प्रमाण अधिक असल्याचंही समोर आलं आहे. एकूण 48 टक्के भारतीय अमेरिकन नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलाय, तर 32 टक्के नागरिकांनी मोदींना नापसंती दाखवली आहे.

भारतीय अमेरिकन नागरिकांनी नेहमीच डेमॉक्रेटिक पार्टीला मतदान करण्यास प्राधान्य दिलं आहे. 2008 मध्ये 93 टक्के भारतीय अमेरिकन मतदारांनी बराक ओबामा यांना मतदान केलं होतं. त्यानंतर मात्र डेमॉक्रेट्सचा भारतीयांवरील प्रभाव कमी होत गेला होता, तसेच रिपब्लिकन पार्टीला पाठिंबा वाढला होता. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1,200 भारतीय अमेरिकन मतदारांच्या सॅम्पलचा सप्टेंबरमध्ये सर्व्हे करण्यात आला होता.

या सर्वेक्षणात ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये 22 टक्के हिंदू, 45 टक्के ख्रिश्चन आणि केवळ 10 टक्के मुस्लीम भारतीय अमेरिकन मतदारांचा समावेश आहे. सध्या अमेरिकेच्या निवडणुकीत अर्थव्यवस्था, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा आणि वंशवाद/वर्णभेद असे अनेक मुद्दे भारतीय अमेरिकन नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरत आहेत.

संबंधित बातम्या :

US Presidential Election: अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी फेसबूकचा राजकीय जाहिरातींबद्दल मोठा निर्णय

US Election : अमेरिकेच्या निवडणुकीत इतिहास, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी

Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांच्या डान्सचा व्हिडीओ वायरल, आपण पाहिला का?

Only 22 percent of NRI like to vote Donald Trump in US Presidential Election

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.