AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लादेनकडून देणगी, कसाबचं ट्रेनिंग..भारताने हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केलेल्या मुरीदकेमधील लष्कर कँपमध्ये काय काय?

लाहोरपासून सुमारे 33 किमी अंतरावर असलेल्या ऐतिहासिक ग्रँड ट्रंक रोडवर असलेले मुरीदके हे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आहे. त्याला 'मरकज-ए-तैयबा' म्हणतात. या परिसरात मशीद आणि अतिथीगृह बांधण्यासाठी लादेनने 1कोटी रुपयांची मदत केली होती.

लादेनकडून देणगी, कसाबचं ट्रेनिंग..भारताने हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केलेल्या मुरीदकेमधील लष्कर कँपमध्ये काय काय?
भारताने हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केलेल्या मुरीदकेमधील लष्कर कँपची महत्वाची माहिती Image Credit source: social media
| Updated on: May 07, 2025 | 8:30 AM
Share

पहलगाममधील बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांच्या नृशंस हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप लोकांच्या मृत्यूचा अखेर भारताने बदला घेतलाआहे. भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. ही तिन्ही सैन्यांची संयुक्त कारवाई होती, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये अनेक दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले, त्यात 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आहे. दरम्यान भारतीय लष्कराने लक्ष्य केलेल्या पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांमध्ये मुरीदकेचाही समावेश आहेत, जिथे लष्करचे मुख्यालाय आहे. ते बनवण्यासाठी कुख्यात दहशतवादीव ओसामा बिन लादेनने एक कोटी रुपयांची देणगी दिली होती.

लाहोरपासून सुमारे 33 किमी अंतरावर असलेल्या ऐतिहासिक ग्रँड ट्रंक रोडवर असलेले मुरीदके हे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आहे. त्याला ‘मरकज-ए-तैयबा’ म्हणतात. या परिसरात मशीद आणि अतिथीगृह बांधण्यासाठी लादेनने 1कोटी रुपयांची मदत केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

2008 शाली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सर्व गुन्हेगार, ज्यात अजमल कसाबचाही समावेश आहे, त्यांना पाकिस्तानच्या आयएसआयने येथेच प्रशिक्षण दिले होते. जैशच्या बहावलपूर मुख्यालयाप्रमाणे हे कॉम्प्लेक्स लष्करचे वैचारिक, लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल सेंटर आहे, तिथे पाकिस्तान आणि काश्मीरमधून शेकडो लोकं भरती केले जातात आणि त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षित केलं जातं.

सुमारे 200 एकरमध्ये पसरलेलं हे संकुल जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी अड्ड्यांपैकी एक मानले जाते. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात हाफिज सईदने ISI आणि बाहेरच्या निधीच्या मदतीने त्याची स्थापना केली होती.

मरकझ हे आधुनिक सुविधांनी युक्त शहर असल्याचे सॅटेलाईट इमेजद्वारे समजतं. त्याचे मुख्य केंद्र एक मशीद आहे, ज्याभोवती शाळा, प्रशिक्षण केंद्रे आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले जाणारे खुले मैदान आहे. या कॉम्प्लेक्समध्ये रुग्णालये, कार्यालये, बँका आणि इतर व्यावसायिक युनिट्स देखील आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.