AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनरल असीम मुनीर आणखी बलवान, भारतावर हल्ले करताच पाकिस्तानने दिलं मोठं गिफ्ट; नेमकं काय मिळालं?

पहलगाममधील दहशतवादी झाल्यानंतर पाकिस्तानचा असमी मुनीर हा लष्करी अधिकारी चांगलाच चर्चेत आला. या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने घेतलेल्या भूमिकेचीही जगभरात चर्चा झाली.

जनरल असीम मुनीर आणखी बलवान, भारतावर हल्ले करताच पाकिस्तानने दिलं मोठं गिफ्ट; नेमकं काय मिळालं?
asim munir
| Updated on: May 20, 2025 | 6:59 PM
Share

Asim Munir : पहलगाममधील दहशतवादी झाल्यानंतर पाकिस्तानचा असमी मुनीर हा लष्करी अधिकारी चांगलाच चर्चेत आला. या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने घेतलेल्या भूमिकेचीही जगभरात चर्चा झाली. तो पाकिस्तानी लष्करात जनरल या मोठ्या हुद्द्यावर आहे. असे असतानाच आता पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तान तसेच पाकिस्तानी लष्कराबाबत वेगवेगळे गंभीर आरोप केले जात असताना ससीम मुनीरला बढती मिळाली आहे.

पाकिस्तानी मंत्रिमंडळाला दिली मंजुरी

पाकिस्तीन लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर आता थेट फील्ड मार्शल या पदावर जाऊन बसला आहे. त्याच्या या बढतीला पाकिस्तानी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयानेचे तसे अधिकृतपणे सांगितले आहे.

फील्ड मार्शल पदाला किती महत्त्व?

पाकिस्तानच्या लष्करात फील्ड मार्शल हे फार महत्त्वाचे आणि मोठे पद आहे. या पदाचा एक वेगळा मानसन्मान असतो. हे पद मिळणाऱ्याला फक्त लष्कराबाबतच नव्हे तर देशाच्या रणनीतीविषयक अधिकारांतही हस्तक्षेप करण्याचा अधिकार असतो. म्हणजेच आता असीम मुनीरला फक्त पाकच्या सेनाच नव्हे तर रणनीतीविषयक निर्णयांतही स्थान दिले जाणार आहे. पाकिस्तानी सरकारच्या या निर्णयामुळे असीम मुनीरची ताकद वाढली आहे.

असीम मुनीर कोण आहे?

असीम मुनीर यांनी 2022 साली पाकिस्तानी लष्करप्रमुखाची जबाबदारी सांभाळली. आता 2025 साली असीम मुनीरला फील्ड मार्शल पदावर बढती मिळाली आहे. असीम मुनीर पाकिस्तानचा 11 वा लष्करप्रमुख आहे. याआधी ते GHQ च्या मुख्यालयात जनरल पदावर काम करत होते. असीम मुनीरने 1986 साली सैन्यातील करिअरला सुरुवात केली. असीम मुनीर हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा प्रमुखही राहिलेला आहे. असीम मुनीर याला सैन्यातील निशान-ए-इम्तियाज़, हिलाल-ए-इम्तियाज़ तसेच प्रतिष्ठित स्वॉर्ड ऑफ ऑनर असे महत्त्वाचे सन्मान मिळालेले आहेत.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.