AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-इस्रायल युद्धामुळे पाकिस्तान बेहाल, सगळे पेट्रोल पंप बंद; आता आली रडण्याची वेळ!

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका आता थेट पाकिस्तानला बसला आहे. इथे बलुचिस्तानमधील पेट्रोल पंप बंद करावे लागले आहेत.

इराण-इस्रायल युद्धामुळे पाकिस्तान बेहाल, सगळे पेट्रोल पंप बंद; आता आली रडण्याची वेळ!
| Updated on: Jun 16, 2025 | 7:22 PM
Share

Iran And Israel War : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आणि तणाव वाढत चालला आहे. या दोन देशांतील युद्धाची धग आता इतर देशांनाही बसत आहे. विशेष म्हणजे आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तानदेखील या युद्धात धुमसत आहे. युद्धाचा परिणाम पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतावर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इराण-इस्रायल युद्धामुळे बलुचिस्तान प्रांतात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कारण बलुचिस्तानमधील अनेक भाग हा इराणकडून दिल्या जाणाऱ्या तेलावर अवलंबून आहे. बलुचिस्तान हा प्रांत इराण आणि अफगाणिस्तान या दोन देशांच्या सीमेलगत आहे.

बलुचिस्तानमधील पेट्रोल पंप बंद

बलुचिस्तानमधील अनेक पेट्रोल पंप हे इराणमधून तस्करीच्या माध्यमातून आणलेल्या तेलावर तसेच डिझेलवर अवलंबून आहेत. आता इस्रायलसोबत चालू असलेल्या युद्धामुळे आता रविवारपासून बलुचिस्तानमधील पेट्रोल पंप बंद झाले आहेत. त्यामुळे शेकडो लोकांना इंधन मिळत नाहीये.

सीमा बंद आता तेल आणि रेशन पुरवठ्यावर परिणाम

बलुचिस्तानच्या प्रशासनाने सुरक्षेच्या कारणामुळे इराणलगतच्या सर्व सीमा सध्या बंद केल्या आहेत. तेथील पंजगूर आणि ग्वादर जिल्ह्यात असलेल्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे तेल पुरवठा बंद पडला आहे. परिणामी इंधनासोबतच खाण्याच्या वस्तूंचाही तुटवडा जाणवतो आहे. ग्वादर जिल्ह्यातील गब्दकालातो हा बॉर्डर पॉइंट हा इराणी तेल व्यापारासाठीचा महत्त्वाचा रस्ता आहे. हाच रस्ता आता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. आता सध्याचे तेलसंकट आल्यामुळे पाकिस्तानच्या सरकारने पट्रोल आणि डिझेटच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोलची किंमत 4.80 पाकिस्तानी रुपयांनी तर डिझेलची किंमत 7.95 पाकिस्तानी रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

सरकारचं म्हणणं काय?

दरम्यान, सध्या बलुचिस्तानमध्ये इंधनाचा तुटवडा जाणवत असला तरी पाकिस्तानी सरकारने घाबरण्याचे कारण नाही, असे सांगितले आहे. क्वेटा यासारख्या मोठ्या शहरांत पेट्रोल पंप चालूच आहेत. तिथे इंधनाची कमतरता नाही. लोक इराणमधून तस्करी करून तेल विकायचे. त्यांचा हा व्यवसाय आता बंद झाला आहे. त्यामुळे ते जनतेत इंधन तुटवडा असल्याच्या अफवा पसरवत आहेत, असा दावा तेथील सरकारने केला आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.