भारताच्या इशाऱ्यावरच… पाकिस्तानचा भारतावर सर्वात गंभीर आरोप, कठपुतली दिल्ली..
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव बघायला मिळाला. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करताना दिसले. अफगाणिस्तानसोबत वाद सुरू असताना पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केला.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये मोठा तणाव बघायला मिळाला. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करत होती. साैदी अरेबियासह कतारने या युद्धात हस्तक्षेप करत युद्ध थांबवण्यास सांगितले. यादरम्यान अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या 28 लष्कर चाैक्यावर ताबा मिळवला. 58 सैनिक पाकिस्तानचे युद्धात ठाक मारल्याचेही अफगाणिस्तानने म्हटले. मागील काही दिवसांपासून भारत- अफगाणिस्तान यांच्यातील जवळीकता वाढलीये आणि हीच पोटदुखी पाकिस्तानची आहे. भारत आणि अफगाणिस्तानमधील मैत्रीमुळे पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानवर दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करण्याचा आरोप केला आहे.
इस्लामाबादवरील कोणत्याही हल्ल्याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल अशी धमकी आसिफ यांनी दिली आहे. अफगाणिस्तानसोबतच्या तणावात पाकिस्तान भारतावर बिनबुडाचे आरोप करताना दिसत आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याला पळू की सळो करून सोडले होते. पाकिस्तानच्या काही सैनिकांना अफगाणिस्तानने ओलीस ठेवले आहे. अफगाणिस्तानला थेट उत्तर न देता पाकिस्तान भारताला टार्गेट करतोय.
एका मुलाखतीमध्ये बोलताना आसिफ यांनी म्हटले की, काबूलमधील कठपुतली आणि कठपुतलीचे कलाकार दिल्लीतून नियंत्रित केले जातात. सीमेवर झालेल्या पराभवाची भरपाई करण्यासाठी भारत हाच अफगाणिस्तानचा वापर करत आहे, यावेळी आसिफ यांचा जळफळाट त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. भारतावर थेट गंभीर आरोप करताना आसिफ हे दिसत आहेत. हेच नाही तर यादरम्यान त्यांनी थेट तालिबानला धमकी दिली.
अफगाणिस्तानबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, इस्लामाबादकडे बघितले तर आम्ही त्यांचे डोळे उपटून टाकू… पाकिस्तानने अगोदर अफगाणिस्तानच्या राजधानीवर हल्ला केला. त्यानंतर त्याला उत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या लष्कर चाैक्यांना टार्गेट करत मोठा हल्ला केला. त्यांच्या टार्गेटवर होती ती म्हणजे पाकिस्तानी लष्कर. या हल्ल्याची अनेक व्हिडीओ आणि फोटोही पुढे आली. मात्र, या वादात पाकिस्तान भारताला ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
