पाकिस्तान कर्जात नाकापर्यंत बुडालं, चीनच्या डावात अलगद फसलं!

पाकिस्तान कर्जात नाकापर्यंत बुडालं, चीनच्या डावात अलगद फसलं!
imran khan

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) कर्ज योजनेसाठी सहा महिन्यात डझनभर अटी-शर्तींची पूर्तता केली.

सचिन पाटील

|

Apr 09, 2021 | 1:56 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) कर्ज योजनेसाठी सहा महिन्यात डझनभर अटी-शर्तींची पूर्तता केली. मात्र भीकेचे डोहेळे लागलेल्या पाकिस्तानची सर्व मदार चीनवर (China) आहे. चीनकडून पाकिस्तानला 11 अब्ज अमेरिकी डॉलरचं सहकार्य अपेक्षित आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या 6 अब्ज डॉलरच्या मदतीसाठी पाकिस्तान जे म्हणेल ते करण्यासाठी तयार असल्याचं चित्र आहे. (Pakistan sinks into debt Despite IMF loan, China remains country’s lifeline what will Imran Khan do)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ऋम कार्यक्रमासाठी पाकिस्तान सरकार ऑक्टोबरपर्यंत वीजबिल 5.65 रुपये प्रति युनीट किंवा 36 टक्के वाढ करण्यास तयार आहे. IMF Loan programme नुसार, पाकिस्तानात वीज ग्राहकांवर 2023 पर्यंत एकूण 884 अब्ज रुपयांचा बोझा पडणार आहे. इतकंच नाही तर IMF च्या अटीसाठी पाकिस्तान जीडीपी 1.1 टक्के किंवा 600 अब्ज रुपयांच्या जवळपास नवे कर लावणार आहे. या अटी त्या 11 अटींपैकी आहेत, ज्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायच्या आहेत. तरच पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळणार आहे. असं असलं तरी पाकिस्तान सर्वाधिक चीनवरच अवलंबून आहे.

अन्य संस्थांकडूनही कर्ज 

पाकिस्तानने पैशांसाठी केवळ चीनकडेच हात पसरलेत असं नाही. पाकिस्तानने चीनसह आजूबाजूच्या देशांकडेही हात पसरले आहेत. चीनकडून 10.8 अब्ज डॉलरच्या मदतीसह, पाकने यूएईकडून दोन अब्ज डॉलर, जागतिक बँकेकडून 2.8 अब्ज डॉलर, जी-20 कडून 1.8 अब्ज डॉलर, आशियाई विकास बँकेकडून 1.1 अब्ज डॉलर आणि इस्लामिक डेव्हलपमेंट बँकेकडून 1 अब्ज डॉलरची मदत मागितली आहे.

चीनकडून सातत कर्ज

पाकिस्तान हे चीनचं गिऱ्हाईक बनलं आहे. एखाद्याने शेजाऱ्याकडे हातउसणे पैसे घ्यावेत, तसं पाकिस्तान सतत चीनकडे हात पसरत राहतो. चलन बदली कार्यक्रमांतर्गत चीनने पाकिस्तानची कर्ज मर्यादा 3 अब्ज डॉलरवरुन वाढवून 4.5 अब्ज डॉलर इतकी केली आहे.

संबंधित बातम्या 

इम्रानने तोंड बंद कराव हेच सर्वांसाठी चांगलं, बलात्काराच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन घटस्फोटीत पत्नींकडूनच खडेबोल

आपल्याला माहित आहे का चीन आपल्या केसांमधून किती पैसे कमवतं? कमाई ऐकून व्हाल थक्क

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें