AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत हादरला! पाकिस्तानने केली थेट या घातक क्षेपणास्त्राची चाचणी, मोठी खळबळ, भारताने..

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्थी केली. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडले. आता पाकिस्तानातून भारताची झोप उडवणारी बातमी येत आहे.

भारत हादरला! पाकिस्तानने केली थेट या घातक क्षेपणास्त्राची चाचणी, मोठी खळबळ, भारताने..
Pakistan Fatah 4 missile
| Updated on: Oct 01, 2025 | 9:12 AM
Share

पहलगाममध्ये पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. ज्यामध्ये हिंदू पर्यटकांना टार्गेट करत गोळ्या झाडल्या. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. हेच नाही तर हल्ला दरम्यान पाकिस्तानातील महत्वाच्या लष्कर एअरबेसचे देखील मोठे नुकसान केले. भारताने केलेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानला म्हणावे तसे उत्तर देता आले नाही. शेवटी त्यांनी अमेरिकेकडे हे युद्ध थांबवण्यासाठी मदत मागितली. आता भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतीय ब्रह्मोससारखे क्षेपणास्त्र विकसित केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्कराने घोषणा केली की, त्यांनी फतह-4 या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.

पाकिस्तानने भारताला धक्का देण्यासाठी आखली योजना 

भारताच्या ऑपरेशन सिंदूरला पाकिस्तान प्रतिउत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी आपली शस्त्र ताकद वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. इस्लामिक स्टेटच्या मीडिया विंग ISPR नुसार, फतह-4 हे जमिनीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे ज्याची क्षमता 750 किलोमीटर आहे. यासोबतच पाकिस्तानने आपले परमाणू कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत.

फतह-4ची पाकिस्तानने केली यशस्वी चाचणी 

फतह-4 मध्ये एव्हियोनिक्स आणि आधुनिक नेव्हिगेशन सिस्टीम आहेत. भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पल्ला 800 किलोमीटर असल्याचे म्हटले जाते. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची बरोबरी करण्यासाठी पाकिस्तानने हे फतह-4 मिसाईल तयार केल्याचेही बोलले जातंय. फतह-4 ची यशस्वी चाचणी झाल्याचे पाकिस्तानने सांगितले. मात्र, पाकिस्तानी लष्कराने प्रेक्षपण स्थळ गुपित ठेवले आहे ते त्यांनी जाहीर केले नाहीये.

पाकिस्तान लष्कराचा अत्यंत मोठा दावा 

आयएसपीआरने दावा केला आहे की फतह-4 भूप्रदेशाला उड्डाण करून शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींपासून वाचू शकते आणि उच्च अचूकतेने लक्ष्यांवर मारा करू शकते. यासोबतच अजूनही काही खास बाब फतहमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्त्रधारी शेजारी आहेत. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये तीन युद्धे झाली आहेत. दोन्ही देश क्षेपणास्त्रांच्या नवीन आवृत्त्यांची चाचणी करतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.