पाकिस्तान नव्हे भिकारीस्तान, स्वाभिमान विकला, मोसाद-अमेरिकेच्या आदेशानुसार करणार असं काम
CNN-News18 च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख आसिम मुनीरने अलीकडेच इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि अमेरिकी CIA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक केली.

पाकिस्तान गाझा पट्टीमध्ये इंटरनॅशनल स्टेबेलायजेशन फोर्स (ISF) अंतर्गत 20 हजार सैनिक पाठवण्याची तयारी करत आहे. ही फोर्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने बनली आहे. हमासला संपवणं हा या फोर्समागचा मुख्य उद्देश आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत पाकिस्तानी आर्मी चीफ आसिम मुनीर यांच्या कथित गुप्त बैठका झाल्या आहेत. त्यानंतर हे पाऊल उचललं जाऊ शकतं. असं झालं तर पाकिस्तान आणि इस्रायलच्या संबंधात तो ऐतिहासिक बदल असेल. कारण पाकिस्तानने अजूनपर्यंत इस्रायलला अधिकृत मान्यता दिलेली नाही. पाकिस्तानाने वास्तवात गाझा पट्टीत सैन्य पाठवलं तर या निर्णयाला इराण,तुर्की आणि कतर सारख्या देशांकडून विरोध होऊ शकतो. कारण हे तीन देश दीर्घ काळापासून हमासचे समर्थक आहेत.
CNN-News18 च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख आसिम मुनीरने अलीकडेच इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि अमेरिकी CIA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक केली. याच बैठकीत गाझा पट्टीत पाकिस्तानी सैनिकांच्या तैनातीवर एकमत झालं. सुत्रांच्या माहितीनुसार, ही संपूर्ण योजना एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व रणनितीक बदलाचा भाग आहे. पश्चिम आशियाच्या सुरक्षा व्यवस्थेला यामुळे नवीन आकार मिळू शकतो.
ट्रम्प यांनी 20 पॉइंटची योजना
पाकिस्तानचा खरा उद्देश हमासची उरली सुरली ताकद निष्क्रिय करणं आणि गाझा पट्टीत स्थिरता आणणं हा आहे. सूत्रांनी हा दावा केला आहे. अधिकृतरित्या याला मानवी पुनर्निर्माण मिशन म्हटलं जात आहे. पण खरा उद्देश इस्रायल आणि पॅलेस्टिनी सशस्त्र गटांमध्ये बफर झोन तयार करणं आहे. हे सैनिक आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण ISF चा भाग असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 पॉइंटची योजना तयार केली आहे. यात गाझाची सुरक्षा संभाळणं आणि पॅलेस्टिनी ऑथोरिटीकडे सोपवणं हा आहे.
पाकिस्तानसाठी एक मोठा आर्थिक दिलासा
रिपोर्ट्सनुसार या तैनातीच्या बदल्यात अमेरिका आणि इस्रायल पाकिस्तानला आर्थिक मदत पॅकेज द्यायला तयार झाले आहेत. यात वर्ल्ड बँक कर्जामध्ये सवलत, परतफेडीमध्ये सवलत आणि खाडी देशांना आर्थिक मदत अशा गोष्टींचा समावेश आहे. ही डील म्हणजे पाकिस्तानसाठी एक मोठा आर्थिक दिलासा आहे.
