पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक आऊट; लाहोर, कराची, रावळपिंडी, बहावलरपूरपर्यंत थरार
पाकिस्तानाने केलेल्या सीमा ओलांडून हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील सात शहरांवर मोठे हवाई हल्ले केले. लाहोर, कराची आणि रावळपिंडीसारख्या प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यात आले. भारताने पाकिस्तानी लष्करी ठिकाणे आणि एअर डिफेन्स सिस्टीमवरही हल्ले केले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली असून ब्लॅकआऊटही जाहीर करण्यात आले आहे. भारताने आपल्या सुरक्षेसाठी उच्च सतर्कता जाहीर केली आहे

पाकिस्तानच्या कुरापती आज दिवसभरही सुरूच राहिल्याने भारताने आज पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला आहे. भारताने थोड्याच वेळापूर्वी पाकिस्तानच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देताना लाहोर, कराची, रावळपिंडी, सियालकोट आणि बहावलपूरपर्यंत हवाई हल्ला चढवला आहे. भारताने पाकिस्तानच्या एकूण सात शहरांवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच घाबरला असून भारताने अधिक हल्ला करू नये म्हणून पाकिस्तान सरकारने अख्ख्या देशातच ब्लॅक आऊट केलं आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे पाकिस्तानी नागरिक प्रचंड हादरले आहेत. पाकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भारताने लाहोरवर मोठा हल्ला केला आहे. ड्रोन आणि मिसाईलद्वारे हा हल्ला करण्यात आला आहे. भारताने लाहोरसह सियालकोट, इस्लामाबाद, रावळपिंडी आणि बहावलपूरमध्ये जोरदार हल्ला केला आहे. भारताच्या या आक्रमक हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्या आधी पाकिस्तानने भारताच्या काही भागात हल्ला केला होता. त्यामुळे भारताने जशास तसं उत्तर म्हणून पाकिस्तानवर हा हल्ला चढवला आहे.
सात शहरांवर हल्ले
भारताने आतापर्यंत पाकिस्तानचे चार विमानं पाडली आहेत. ही चारही लढाऊ विमाने आहेत. भारताने पाकिस्तानचं एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम पंजाब प्रांतात पाडलं आहे. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर राजस्थानातून फायटर विमान उडाले. जम्मू-काश्मीर हायवेवर जोरदार धमाके झाल्याचं ऐकायला आले. तर उरी सेक्टरमध्ये फायरिंग झाली. पाकिस्तानने भारताची सात शहरं टार्गेट केली होती. त्यामुळेच भारतानेही पाकिस्तानच्या सात शहरांवर ताबडतोब हल्ले केल्याने पाकिस्तानमध्ये हाहा:कार उडाला आहे.
हाय अलर्ट जारी
भारताच्या सुरक्षेसाठी आम्ही तयार आहोत. आमच्यावर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही जशास तसे उत्तर देणार असा इशारा भारतीय सैन्याने दिला आहे. तसेच देशातील सर्व विमानतळांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. भारताच्या तिन्ही सैन्यांना अलर्ट राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, भारताने आज दिवसभरात पाकिस्तानातील तीन एअर डिफेन्स सिस्टिम बंद केली होती. लाहोर, कराची आणि रावळपिंडीतील ही सिस्टिम बंद करण्यात भारताला यश आलं आहे. त्यामुळे पाकिस्तान हादरून गेला आहे. पाकिस्तानने संपूर्ण ब्लॅकआऊट केला असला तरी भारताकडून पाकिस्तानवर हल्ला सुरूच आहे.