AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींनी दिली थायलंडच्या ऐतिहासिक ‘वाट फो’ मंदिराला भेट, भारताच्या परराष्ट्र धोरणात बौद्ध धर्माचे महत्त्व काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या थायलंडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बँकॉक येथील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असलेल्या बौद्ध मंदिराला भेट दिली.

नरेंद्र मोदींनी दिली थायलंडच्या ऐतिहासिक 'वाट फो' मंदिराला भेट, भारताच्या परराष्ट्र धोरणात बौद्ध धर्माचे महत्त्व काय?
narendra modi
| Edited By: | Updated on: Apr 04, 2025 | 10:50 PM
Share

PM Narendra Modi Thailand Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या थायलंडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी आपल्या या दौऱ्यात थायलंडमधील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत आहेत. दरम्यान, मोदी यांनी शुक्रवारी (4 फेब्रुवारी) वाट फ्रा चेतुफोन विमोन मंगखलाराम राजवरमहाविहानचा दौरा केला. यावेळी थायलंडच्या पंतप्रदान शिनावात्रा यादेखील होत्या.

एकूण 20 एकरात पसरलेले आहे मंदीर

आपल्या या भेटीत त्यांनी गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला अभिवादन केले. तसेच वरिष्ठ बौद्ध भिक्षूंना संघदानही केले. दरम्यान, हे मंद या मंदिराला ‘वाट फो’ असेदेखील म्हटले जाते. बँकाँक शहरातील हे सर्वाधिक जुने आणि सर्वाधिक मोठ्या मंदिरापैकी एक मंदीर आहे. हे मंदीर एकूण 20 एकर भूभागात पसरलेले आहे. या मंदिर परिसरात आकर्षक सजावट केलेली आहे. अनेक मूर्ती तसेच सुंदर उद्यानही आहे.

मंदिराची निर्मिती कधी झाली?

या मंदिराची निर्मिती 16 व्या शतकात करण्यात आली होती. राज राम प्रथम यांच्या शासनकाळात हे मंदीर उभारण्यात आले होते. या मंदिराला अगोदर वाट फोटाराम या नावानेही ओळखले जायचे. या मंदिराचा उपयोग अगोदर पारंपरिक उपचार, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी केला जायचा. नंतरच्या काळात आलेल्या राजांनी या मंदिराचा विस्तार केला. राजा राम तृतीय यांच्या काळात या मंदीर परिसरातील इमारतींचा विकास करण्यात आला. तसेच अनेक मूर्ती बनवण्यात आल्या.

भारताच्या परराष्ट्र धोरणात बौद्ध धर्माचे महत्त काय?

भारताच्या परराष्ट्र धोरणात वेगळं असं महत्त्व आहे. 2024 साली नंरेंद्र मोदी यांनी भारत-आशियाई शिखर संमेलनात लाओसचे राष्ट्रपती थोंगलून सिसोउलिथ यांना एक जुनी आणि दुर्मिळ अशी बुद्ध मूर्ती भेट दिली होती. या मूर्तीकडे दोन देशांतील समान वारसा आणि संस्कृतिक संबंधांच्या दृष्टीने भारताची वचनबद्धता याचे प्रतिक म्हणून पाहिले गेले. 2023 मध्ये मोदी आणि जपनाचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी दिल्लीमध्ये बुद्ध जंयती पार्कमध्ये बोल बोधीवृक्षाला भेट दिली होती. 2022 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेला नेपाळमध्ये जाऊन लुम्बिनीचा दौरा केला होता. 2017 साली श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना मोदी यांनी गंगारामया बौद्ध मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यातील धार्मकि आणि सांस्कृतिक संबंध बळकट झाले. 2016 साली मोदी यांनी व्हिएतनामच्या दौऱ्यावर असताना हनोई येथे क्वान सू पॅगोडाचा दौरा केला होता. तेथे त्यांनी बौद्ध भिक्खूंसोबत चर्चाही केली होती.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.