AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात खळबळ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट सुनावले, म्हणाले, अशाने विश्वासार्हता कमी…

अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावून सर्वांनाच मोठा धक्का दिला. अमेरिकेच्या टॅरिफनंतर जगभरात खळबळ उडाली असून नवीन समीकरण पुढे येताना दिसतंय. भारत, रशिया आणि चीन एकाच मंचावर आले आहेत. यामुळे हा अमेरिकेला मोठा धक्काच म्हणावा लागेल.

जगात खळबळ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट सुनावले, म्हणाले, अशाने विश्वासार्हता कमी...
Narendra Modi
| Updated on: Sep 01, 2025 | 12:54 PM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनमधील 31 व्या एससीओ शिखर संमेलनात सहभागी झाले आहेत. यावेळी बैठकीसाठी नरेंद्र मोदी आणि पुतिन हे दोघेच एकाच गाडीमध्ये रवाना झाले. या फोटोने जगात मोठी खळबळ उडालीये. रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, याकरिता अमेरिका सतत दबाव टाकत असताना पुतिन आणि मोदी यांनी एकाच गाडीतून थेट प्रवास केला. या संमेलनातून पाकिस्तानवरही निशाणा साधताना थेट नरेंद्र मोदी हे दिसले आहेत. दहशतवादाबद्दल बोलताना ते दिसले.

संमेलनात नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबद्दल परखड मत मांडले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, जेव्हा एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन होते तेव्हा एखादे नाते जोडणे याचा अर्थ आणि विश्वासार्हता कमी होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CPEC चे नाव घेणे टाळले. मात्र, त्यांच्या निशाण्यावर CPEC च होती. मुळात म्हणजे आता एससीओ संमेलनात काही समीकरणे बदलताना दिसली आहेत. सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगामवरील हल्ल्याबाबत भाष्य केले तर दुसरीकडे दहशतवाद्याच्याविरोधात कडक आणि रणनीती आखण्यासाठी घोषणा पत्र दिले.

त्यांनी पहलगाममधील हल्ल्याचा कडक शब्दात निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, मी सर्वात अगोदर सर्व मित्र देशांचे धन्यवाद देतो की, ज्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा विरोध केला आणि आमच्या वाईट काळात सोबत उभे राहिले. एक प्रश्न आहे की, काही लोक थेट पणे दहशतवादाचे समर्थन करत आहेत, त्याचा आपण स्वीकार करतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, दहशतवादाच्या विरोधात आपण सर्वांनीच एकत्र यायला पाहिजे.

जर आपण दहशतवादाला प्रोत्साहन दिले तर कोणताही देश आणि समाज सुरक्षित राहू शकत नाही. यासोबतच त्यांनी चीनला संदेश देत स्पष्ट केले की, दहशतवादावर ते दुटप्पी भूमिका घेऊ शकत नाहीत. कारण दहशतवादावर भारताबद्दल चीनचे वागणे दरवेळी वेगळे असते. यामुळे विश्वास उडतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. थेट चीनच्या भूमीवर जाऊन त्यांना सुनावताना नरेंद्र मोदी हे दिसले आहेत.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.