AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! लग्नासाठी ‘या’ देशात मुलींचे अपहरण, पाच पैकी एका मुलीचे जबरदस्तीने लग्न

किर्गिस्तानमध्ये अजूनही महिलांना पळवून नेऊन त्यांच्याशी लग्न लावणे हे परंपरा जोपासल्यासारखे वाटते. (kyrgyzstan protest because kidnapping women murder)

धक्कादायक ! लग्नासाठी 'या' देशात मुलींचे अपहरण, पाच पैकी एका मुलीचे जबरदस्तीने लग्न
kyrgyzstan protest
| Updated on: Apr 09, 2021 | 10:17 PM
Share

बिश्केक : जगात कशी आणि कोणती परंपरा असेल हे सांगता येत नाही. किर्गिस्तानमध्ये तर महिलांना पळवून नेऊन त्यांच्यासोबत लग्न करण्याची परंपरा आहे. मुळात या परंपरेला 2013 मध्येच संपुष्टात आणण्यासाठी येथील सरकारने आदेश दिले होते. मात्र, अजूनही महिलांना पळवून नेऊन त्यांच्याशी लग्न लावणे येथील लोकांना परंपरा जोपासल्यासारखे वाटते. (protest in Kyrgyzstan because kidnapping and murder of women for marriage people think that it is tradition)

याच परंपरेमधून किर्गिस्तानमध्ये एका महिलेला लग्न करण्यासाठी जबरदस्तीने किडनॅप करण्यात आले. या किडनॅप केलेल्या महिलेचा मृतदेह नंतर एका गाडीमध्ये आढळलून आला. या प्रकारानंतर महिलांना पळवून त्यांच्याशी लग्न करण्याच्या या मुद्द्यावरुन या देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या कथित परंपरेला विरोध करण्यासाठी येथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

महिलेला तीन लोकांनी किडनॅप केलं, नंतर मृतदेह आढळला

मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय एजादा केनेतबेकोवा या महिलेला एकूण तीन लोक एका कारमधून जबरदस्तीने नेत होते. यातील एक माणूस या महिलेशी लग्न करण्यास उत्सुक होता. त्यामुळेच या महिलेचे अपहरण करण्यात येत होते. या घटनेचा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार घडल्यानंतर पोलीस या कारचा शोध घेऊ शकले नव्हते. परिणामी या महिलेचा मृतदेह दुसऱ्या एका कारमध्ये आढळला होता. याच कारणामुळे किर्गिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहे.

लग्नासाठी महिलांच्या अपहरणाची परंपरा

महिलांच्या अपहरणासंदर्भात विचारले असता किर्गिस्तानमध्ये लग्नासाठी महिलांचे अपहरण करणे ही येथील परंपरा असल्याचे अनेकांचे मत आहे. तसेच याविषयी बोलताना ही परंपरा सेंट्रल आशियाई देशांमध्ये मागील काही दशकांपासून चालत आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 2013 साली या परंपरेला थांबवण्यात आलं होतं. तसेच, एखाद्या महिलेने पोलिसांत तक्रार केलीच तर अशा प्रकरणांमध्ये अहरणकर्त्यांसोबत थोडी नरमाईची भूमिका घेतली जाते. एखाद्या महिलेचे अपहरण झाल्यानंतर ही महिला आधीच भयभीत झालेली असते, त्यामुळे अनेक महिला तक्रार दाखल करण्यास धजावत नाहीत, असेसुद्धा सांगण्यात आले आहे.

अपहरणकर्त्यासुद्धा मृतदेह  आढळला

मिळालेल्या माहितीनुसार तीन अपहरणकर्त्यांपैकी एकाचा मृतदेह तरुणीच्या मृतदेहाशेजारी आढळला आहे. या तरुणावर आधीच चाकूने वार करण्यात आला होता. त्यामुळे रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. तिघांमधील आणखी एका अपहरणकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

युनायटेड नेशन्सकडून चिंता व्यक्त

किर्गिस्तान देशात मुलीचे एक निश्चित वय झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी तिच्यावर दबाव टाकतात. तसेच या देशात गरीब घरातील युवकांना महिलांचे उपहरण करुन त्यांना घरी आणणे हा अतिशय सोपा आणि प्रभावशाली मार्ग असल्याचे वाटत आले आहे. याच कारणामुळे येथे जबरदस्तीने अपहरण करुन  मुलींसोबत लग्न लावण्याचे प्रकार घडतात. दरम्यान, किर्गिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता युनायटेड नेशन्सने चिंता व्यक्त केलेली आहे. यूएनच्या अकडेवारीनुसार किर्गिस्तानमध्ये प्रत्येक पाच पैकी एका महिलेचे लग्न हे अपहरण करुन जबरदस्तीने झालेले आहे.

इतर बातम्या :

Corona Update : नियम मोडणं महागात, पोलिसाने थेट पंतप्रधानांनाच ठोठावला दंड!

अमेरिकेचं युद्ध जहाज परवानगीशिवायच भारताच्या हद्दीत, लक्षद्वीपजवळील हालचालींनी तणाव वाढण्याची शक्यता

Prince Philip : इंग्लंडच्या राणीचे पती, प्रिन्स फिलीप यांचं 99 व्या वर्षी निधन

(protest in Kyrgyzstan because kidnapping and murder of women for marriage people think that it is tradition)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.