युक्रेनवर अंधार दाटला…; वीजघरावरच क्षेपणास्त्र डागलं…

रशियाने कालच युक्रेनच्या 12 शहरांवर 75 क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला वीज घरंही उडवून देण्यात आली आहेत.

युक्रेनवर अंधार दाटला...; वीजघरावरच क्षेपणास्त्र डागलं...
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 6:22 PM

कीवः रशिया आणि युक्रेनच्या (Russia and Ukraine)  युद्धामुळे (War) दोन्ही देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रशियाकडून वारंवार क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू झाल्याने युक्रेन उद्धवस्त होण्याच्याच मार्गावर याहे. काल रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिकाच चालू केली होती, त्यानंतर आज युक्रेनमधील ल्विव्हच्या वीज प्रकल्पांवरच क्षेपणास्त्रं ढागण्यात आले आहे. पश्चिम युक्रेनमधील ल्विव्हमध्ये रशियाकडून तीन स्फोट करण्यात आले आहेत. ल्विव्हमधील वीज घरावर हल्ला (Attack on power house) केल्यापासून तो सगळा परिसरात अंधारात गुडूप झाला आहे.

रशियाने नुकत्याच केलेल्या या हल्ल्यामुळे आता युक्रेनच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. गव्हर्नर मॅक्सिम कोझित्स्की, ल्विव्हचे महापौर आंद्रे सडोव्ही यांच्यासह येथील अधिकारी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी टेलिग्रामवरु सांगितले की, ल्विव्ह शहरात मोठ मोठे तीन स्फोट झाल्यानंतर अनेक शहरं आणि गावं अंधारात गुडूप झाली आहेत.

यानंतर अनेक शहरांतील वीज गायब झाली असून रशियाकडून काल 75 क्षेपणास्त्रांचा हल्ला केला गेला होता.

या हल्ल्यामुळे रशियाने आता ल्विव शहरातील वीज प्रकल्पांना लक्ष्य केल्याच दिसून येत आहे. तीन स्फोटांनी ल्विव शहर पूर्णपणे हादरुन गेले आहे.

रशियाने कालच युक्रेनच्या 12 शहरांवर 75 क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला असून या हल्ल्यांमध्ये लिव्ह, पोल्टावा, खार्किव, कीव या शहरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये न येण्याचा सल्ला दिला आहे. युक्रेन आणि रशियामधील संघर्ष तीव्र झाल्यानंतर भारतीय दूतावासाकडून हा सल्ला देण्यात आला आहे.

दूतावासाने भारतीयांना युक्रेनमधील त्यांच्या वास्तव्याबद्दल माहिती देण्यास सांगितले असून त्यांना त्यांच्या परिस्थितीची माहितीही कळविण्यास सांगितले आहे.

रशियाने सोमवारी युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यूही झाला आहे.

राजधानी कीवमध्ये झालेल्या हल्ल्यात सहा जण ठार झाल्याची माहिती सांगण्यात येत असली तरी अनेक लोकं त्या हल्ल्यात ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे.

तर त्यानंतर सकाळच्या झालेल्या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू त्यानंतरही क्षेपणास्त्रं डागण्यात आली त्यामध्ये 60 जणांपेक्षा अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.