‘आमचा लढा आमची भूमी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी!’ यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना स्टॅन्डिंग ओवेशन

आपल्या संबोधनात दरम्यान जेलेन्स्की भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या संबोधनात जेलेन्स्की म्हणाले की स्वत:ला यूरोपियन यूनियनमध्ये पाहून आनंद झाला. आपल्याला इथं येण्यासाठी एवढी किंमत मोजावी लागेल हा विचार केला नव्हता. रशिया आमच्या रहिवासी भागाला निशाणा बनवतोय. आम्ही हजारो यूक्रेनी नागरिकांना गमावलं आहे, अशी खंत जेलेन्स्की यांनी व्यक्त केलीय.

'आमचा लढा आमची भूमी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी!' यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना स्टॅन्डिंग ओवेशन
वोलोदिमीर झेलेन्स्की यांना यूरोपीयन यूनियनमध्ये स्टॅन्डिंग ओवेशनImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 6:46 PM

नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर यूक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी मंगळवारी यूरोपीय यूनियनमध्ये (European Union) संबोधित केलं. आपल्या संबोधनात दरम्यान जेलेन्स्की भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या संबोधनात जेलेन्स्की म्हणाले की स्वत:ला यूरोपियन यूनियनमध्ये पाहून आनंद झाला. आपल्याला इथं येण्यासाठी एवढी किंमत मोजावी लागेल हा विचार केला नव्हता. रशिया आमच्या रहिवासी भागाला निशाणा बनवतोय. आम्ही हजारो यूक्रेनी नागरिकांना गमावलं आहे, अशी खंत जेलेन्स्की यांनी व्यक्त केलीय. महत्वाची बाब म्हणजे यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना संबोधनानंतर स्टॅन्डिंग ओवेशन मिळाली.

इतकंच नाही तर जेलेन्स्की यांनी आपल्या संबोधनात आपला निर्धार स्पष्ट केला. ‘आमचा लढा आमची भूमी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी! शहरं ब्लॉक असली तरी आम्हाला कुणीच तोडू शकत नाही, आम्ही कणखर आहोत! आम्ही युक्रेनियन्स आहोत!’, अशा शब्दात जेलेन्स्की यांनी यूक्रेन आपल्या मतांवर ठाम असल्याचं म्हटलंय. तसंच आमचे सैनिक मैदानात मजबुतीने टिकून आहेत. यूक्रेन रशियाला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. यूक्रेन आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढतोय. आम्ही रशियासमोर गुडघे टेकणार नाहीत, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय.

जेलेन्स्की यांना स्टॅन्डिंग ओवेशन

यूरोपीयन यूनियनमध्ये यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांना स्टॅन्डिंग ओवेशन मिळाली. सर्वांनी जेलेन्स्की यांचं संबोधन शांतपणे ऐकून घेतलं. ‘आम्ही आमच्या जमिनीची सुरक्षा आणि आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढत आहोत. आम्ही कुणी तोडू शकत नाही. आम्ही मजबूत आहोत. आम्ही यूक्रेनियन आहोत’, असं जेलेन्स्की म्हणाले.

इतर बातम्या : 

Russia Ukraine War: आहे त्या साधनांसह क्यीव सोडा, असं काय घडण्याची भीतीय भारत सरकारला? असा निर्वाणीचा इशारा द्यावा लागला

नवीनचा मृतदेह शक्य तितक्या लवकर भारतात आणू, परराष्ट्र मंत्रालयाकडून नवीनच्या कुटुंबीयांचं सांत्वन

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.