इथं घडतात गुप्तहेर, खास विद्यापीठात दिलं जातं जासूस होण्याचं प्रशिक्षण; अभ्यासक्रम वाचून चकित व्हाल!
Secrete Agents : इतिहासात अनेक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध गुप्तहेर होऊन गेले. आजच्या काळातही जगातील प्रत्येक देशात गुप्तहेर असतात. जे संबंधित देशाची माहिती आपल्या देशाच्या सरकारला देत असतात.

जगाच्या इतिहासात गुप्तहेरांची भूमिका नेहमीच महत्चाची राहिलेली आहे. इतिहासात अनेक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध गुप्तहेर होऊन गेले. आजच्या काळातही जगातील प्रत्येक देशात गुप्तहेर असतात. जे संबंधित देशाची माहिती आपल्या देशाच्या सरकारला देत असतात. फ्रान्समध्ये एक असे विद्यापीठ आहे जिथे गुप्तहेरांना प्रशिक्षण दिले जाते. या विद्यापीठातील प्राध्यापकांना त्यांच्याकडे शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची खरी नावेही माहीत नसतात. कारण या विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी हे फ्रान्सच्या गुप्तचर संस्थांशी संबंधित आहेत. या बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
‘हेरगिरी’ शिकवली जाते
बीबीसी उर्दूच्या एका वृत्तानुसार पॅरिसच्या बाहेर स्थित ‘Sciences Po Saint-Germain’ विद्यापीठाचे कॅम्पस आहे. 20 व्या शतकातील ही इमारत आणि तिचे जड लोखंडी दरवाजे एखाद्या हेरगिरीच्या चित्रपटासारखे आहे. या विद्यापीठात एक विशेष डिप्लोमा आहे. ज्याचे नाव ‘Diplôme sur le Renseignement et les Menaces Globales’ (इंटेलिजन्स आणि जागतिक धोक्यांवरील डिप्लोमा) असे आहे. हा कोर्स केवळ सामान्य विद्यार्थीच नव्हे तर फ्रान्सच्या गुप्तचर संस्थांचे अधिकारीही करतात.
2015 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोर्सला सुरूवात
हेरगिरीचा हा कोर्स सुमारे 10 वर्षांपूर्वी फ्रान्स सरकारच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आला होता. 2015 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने गुप्तचर संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती सुरू केली. नवीन आणि जुन्या गुप्तहेरांना सतत प्रशिक्षण मिळत राहावे, यासाठी हा कोर्स सुरु करण्यात आलेला आहे.
काय शिकवले जाते?
या चार महिन्यांच्या कोर्समध्ये 120 तासांचा अभ्यास आहे. याची फी सुमारे 5000 युरो आहे. येथे संघटित गुन्हेगारी, इस्लामी कट्टरवाद, राजकीय हिंसाचार, बिझनेस इंटेलिजन्स, सायबर आणि आर्थिक युद्ध याबाबत शिक्षण दिले जाते. या वर्षाच्या बॅचमध्ये 28 विद्यार्थी आहेत, ज्यांपैकी 6 सक्रिय गुप्तहेर आहेत. तसेच या बॅचमध्ये निम्म्या विद्यार्थिनी आहेत. या कोर्ससाठी प्रत्येकाला प्रवेश मिळत नाही. यासाठी फ्रान्सचा नागरिक असणे अनिवार्य आहे. परदेशी लोकांचे अर्ज फेटाळले जातात. दरम्यान, हा कोर्स केल्यानंतर हे गुप्तहेर परदेशात जाऊन देशासाठी महत्वाची माहिती गोळा करतात आणि सरकारला देतात. यामुळे एखादे ऑपरेशन राबवणे सोपे होते.
