बायकोला विसरलो, कारमध्ये सीएनजी भरला, 300 किमी गेल्यावर आली पत्नीची आठवण, तरुणाची तक्रार ऐकून पोलीस धक्क्यात
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल किंवा तुमच्यासोबत देखील घडलं असेल तुम्ही कुठेतरी फिरायला गेला आहात आणि तुम्ही तिथे तुमचं सामान विसरला, मात्र एक व्यक्ती चक्क आपली बायको विसरल्याची घटना घडली आहे.

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल किंवा तुमच्यासोबत देखील घडलं असेल तुम्ही कुठेतरी फिरायला गेला आहात आणि तुम्ही तिथे तुमचं सामान विसरला. मात्र असं कधी ऐकलं आहे का? की एखादा व्यक्ती बाहेर फिरण्यासाठी गेला आणि आपल्या बायकोलाच विसरून आला? अशी एक घटना आता समोर आली आहे. ही घटना फ्रान्समध्ये घडली आहे. फ्रान्समध्ये एक व्यक्ती आपली पत्नी आणि मुलीसोबत सुट्टी घालवण्यासाठी दुसऱ्या शहरामध्ये गेला होता, तेव्हा त्याच्यासोबत हा विचित्र प्रकार घडला आहे, जेव्हा त्याने पोलिसांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला आहे.
अनेकजण बाहेर कुठे फिरायला गेले तर आपलं सामान विसरतात, मात्र हा व्यक्ती चक्क आपली बायकोच विसरला आहे. जिथे तो आपल्या पत्नीला विसरला त्या अंतरापासून तो 300 किलोमीटर दूर गेला आणि नंतर त्याला आपल्या पत्नीची आठवण झाली. ही घटना फ्रान्समधील आहे. फ्रान्समधील एक कुटुंब सुट्ट्या असल्यामुळे पर्यटनासाठी मोरक्कोला गेलं होतं. तिथे या व्यक्तीने एका सीएनजी स्टेशनवर सीएनजी भरण्यासाठी गाडी थांबवली, कारमध्ये सीएनजी भरला, मात्र पत्नीला न घेता हा व्यक्ती तसाच घराकडे निघाला, तब्बल तीनशे किलोमीटर गेल्यानंतर त्याला आपल्या पत्नीची आठवण आली, आपली पत्नी आपल्यासोबत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं.
जेव्हा ही घटना घडली होती, तेव्हा या व्यक्तीसोबत त्याची मुलगी देखील होती, मात्र समोर आलेल्या माहितीनुसार ती संपूर्ण प्रवासात झोपली होती, त्यामुळे आपली आई आपल्यासोबत नाही हे तिच्या देखील लक्षात आलं नाही. जेव्हा तीनशे किलोमीटर पुढे गेल्यानंतर घडलेला प्रकार त्याच्या लक्षात आला, त्यानंतर त्याने तातडीने तेथील इमरजेन्सी नंबरला फोन लावला आणि घडलेला प्रकार सांगितला. घडलेला प्रकार ऐकून पोलिसांना देखील प्रचंड धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला त्याची बायको शोधून देण्यास मदत केली, त्याने आपल्या बायकोला जिथे सोडलं होतं त्याच स्टेशनवर त्याची बायको तोपर्यंत बसून होती.
