डबघाईला आलेल्या पाकिस्तानला चीनने पुन्हा घातली भीक, यंदाची रक्कम आहे सर्वात मोठी

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानने आयएमएफसह जगभरातील देशांकडून कर्जाची मागणी केली आहे. परंतु त्यांना सर्व ठिकाणाहून नकारच मिळाला.

डबघाईला आलेल्या पाकिस्तानला चीनने पुन्हा घातली भीक, यंदाची रक्कम आहे सर्वात मोठी
पाकिस्तान Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 1:39 PM

कराची : आर्थीक परिस्थीमुळे डबघाईला आलेल्या पाकिस्तानला चीनकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या (State Bank Of Pakistan) परकीय चलन साठ्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कारण देशाला चीन डेव्हलपमेंट बँकेकडून  700 दशलक्ष डॉलर्स मिळाल्या आहेत. अर्थमंत्री इशाक डार यांनी ट्विटरवर जाहीर केले की, “अलहमदुलाला! स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला आज चीन डेव्हलपमेंट बँकेकडून (China Development Bank)  700 दशलक्ष डॉलर्स मिळाले. पाकिस्तान आधीच चीनच्या कर्जात असल्याचे जगजाहीर आहे.

सगळीकडे पसरले हात

खरं तर, आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानने आयएमएफसह जगभरातील देशांकडून कर्जाची मागणी केली आहे. परंतु त्यांना सर्व ठिकाणाहून नकारच मिळाला. अशा परिस्थितीत, आता ही मदत पाकिस्तानला मोठा दिलासा देणारी आहे. तथापि, काही दिवसांआधी असेही वृत्त प्रकाशीत झाले होते की, पाकिस्तानने जगातील सर्वात शक्तिशाली कुटुंबांपैकी एक असलेल्या रॅथचिल्ड कुटुंबासमोरही हात पसरले होते . रॅथसिल्ड फॅमिली रथसचिल्ड अँड कंपनी नावाची बहुराष्ट्रीय वित्त कंपनी चालवते. ही काही साधारण कंपणी नसून बर्‍याच देशांना कोट्यवधी रूपयांचे कर्ज देणारी मोठी संस्था आहे. या कंपनीने आतापर्यंत सुमारे 30 देशांना आर्थिक मदत देऊन त्यांना डीफॉल्ट होण्यापासून वाचवले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे खराब स्थितीत आहे. सरकारी तीजोरीत ठणठणाट आहे. पाकिस्तानी वर्तमानपत्रांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानचे परकीय चलन साठा 3 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी आहे. ही रक्कम 15 दिवसांच्या आयात करण्यासाठी पुरेशी आहे. आयएमएफच्या अहवालानुसार पाकिस्तान 126 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या कर्जात आहे. चीनचे सुमारे 30 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे सर्वाधिक कर्ज आहे.

भारतातची काय भुमीका आहे?

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आर्थिक दुर्दशाबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले आहेत की पाकिस्तानचे भविष्य स्वतःच्या कृतीवर अवलंबून आहे. परराष्ट्रमंत्री म्हणाले की, ते आपल्या आर्थिक संकटातून कसे बाहेर पडेल  हे सर्वस्वी पाकिस्तानवर अवलंबून आहे. श्रीलंकेला भारताने दिलेल्या मदतीचा संदर्भ देताना जयशंकर म्हणाले की, भारताने श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटात मदत केली. परंतु भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंध पाकिस्तानपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.