अंबाजोगाईच्या ‘त्या’ जोडप्यावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार होणार? मंदिरांची मदत नाही? पुजारीही मिळेना?; वाचा सविस्तर

अंबाजोगाईच्या 'त्या' जोडप्यावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार होणार? मंदिरांची मदत नाही? पुजारीही मिळेना?; वाचा सविस्तर
balaji rudrawar

अमेरिकेतील अर्लिंग्टन येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या बीड येथील बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार यांच्या पार्थिवावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. (temples not provide a free priest to cremation of Aarti and balaji rudrawar in USA)

भीमराव गवळी

|

Apr 14, 2021 | 1:26 PM

न्यूजर्सी: अमेरिकेतील अर्लिंग्टन येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या बीड येथील बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार यांच्या पार्थिवावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचंड संसर्ग वाढल्याने रुद्रवार दाम्पत्यावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अंत्यविधीसाठी पुजारी मिळत नसून मंदिरांनीही मदत नाकारली असल्याचं वृत्त येथील ‘लेटेस्ट न्यूज’ या वृत्तसंस्थेने दिलं आहे. (temples not provide a free priest to cremation of Aarti and balaji rudrawar in USA)

‘लेटेस्ट न्यूज’च्या वृत्तानुसार, बालाजी आणि आरती यांचे भाऊ अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मोहन नान्नापानेनी यांनी दिली. नान्नापानेनी हे बालाजी यांच्या कन्येसाठी आर्थिक मदत गोळा करत आहेत. बालाजी आणि आरती यांच्या भावांना अमेरिकेत वास्तव्यासाठी निधीची नितांत गरज आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी सांगितलं. नान्नापानेनी हे 2017पासून संकटात असेलल्या कुटुंबांना मदत करण्याचे काम करत आहेत.

आजच अंत्यसंस्कार

आम्ही अंत्यसंस्कार अधिक काळ रोखू शकत नाही. आज बुधवारीच बालाजी आणि आरतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. कारण त्यांच्या कुटुंबीयांनीही लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्यास सांगितलं आहे. कारण दोघांच्याही शरीरावर अनेक जखमा आहेत. त्यामुळे मृतदेह दीर्घकाळ ठेवता येणार नाही, असंही त्यांनी ‘इंडिका न्यूज’ला सांगितलं.

साडे सात लाख खर्च

हे एकूण तीन मृतदेह आहेत. आरती आणि बालाजीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तर मृत नवजात अर्भकाला पुरण्यात येणार आहे, असं नान्नापानेनी यांनी सांगितलं. या अंत्यसंस्कारासाठी एकूण 10 हजार डॉलर म्हणजे 7,51,775 रुपये खर्च येणार आहेत. त्यासाठी बालाजी काम करत असलेल्या लार्सन अँड टुब्रोकडून मदत केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुजारी मिळत नाही, मंदिरांची मदत नाही

हिंदूपद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी पुजारी शोधला आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर दुर्देवाने देशातील एकही हिंदू मंदिर यासाठी मदत करण्यास पुढे आले नाही. बहुतेक मंदिरांनी मोफतमध्ये पुजारी देण्यास नकार दिला आहे, असं नान्नापानेनी यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही खासगी पुजारी घेण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी 400 ते 500 डॉलर्स म्हणजे 30,060 रुपये ते 37,576 रुपये खर्च येणार आहे. आम्हाला मंदिरावर टीका करायची नाही. पण आम्ही मंदिरासाठी हजारो हजारो डॉलर्स दान केले आहेत. पण ते समजासाठी उपयोगाला येत नाहीत. आम्हाला केवळ तासाभरासाठी पुजारी हवा आहे. परंतु आम्हाला पुजारी दिला जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

 संशयास्पद मृत्यू

32 वर्षीय बालाजी रुद्रवार आणि 30 वर्षीय आरती रुद्रवार यांचा मृतदेह गेल्या बुधवारी न्यूजर्सीतील राहत्या अपार्टमेंटमध्ये चाकूने भोसकलेल्या अवस्थेत आढळला होता. बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत बसल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी या घटनेबद्दल पोलिसांना कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (temples not provide a free priest to cremation of Aarti and balaji rudrawar in USA)

संबंधित बातम्या:

अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत हत्या-आत्महत्या, पण 3 वर्षाच्या चिमुरडीचं काय होणार?

बीडमधील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?; जाणून घ्या 10 पॉइंट्समधून

अमेरिकेत असं काय घडलं की अंबाजोगाईच्या बालाजीनं बायकोला मरोस्तर भोसकलं? मग बालाजी कसा संपला? कोर्टात नवी माहिती उघड

अंबाजोगाईच्या ‘त्या’ कपलचं अमेरिकेत काय झालं?; नवऱ्यानेच बायकोला भोसकलं?, वाचा सविस्तर

(temples not provide a free priest to cremation of Aarti and balaji rudrawar in USA)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें