AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येत आहे शत्रूचा कर्दनकाळ,रशिया भारताला S-400 चे उरलेले दोन स्क्वॉड्रन केव्हा देणार, काय आहे अपडेट

ऑपरेशन सिंदूर दरम्यान रशियाने भारताला दिलेल्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानची दाणादाण उडविली होती. या एस-400 स्क्वाड्रनचा उर्वरित ताफा लवकरच भारताला रशिया देणार आहे. याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहीती दिली आहे.

येत आहे शत्रूचा कर्दनकाळ,रशिया भारताला S-400 चे उरलेले दोन स्क्वॉड्रन केव्हा देणार, काय आहे अपडेट
| Updated on: Jun 27, 2025 | 4:28 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या धुमश्चक्रीत रशियाने आपल्याला दिलेल्या एअर डीफेन्स सिस्टीम S-400 ने कमाल केली होती. पाकिस्तानच्या अनेक क्षेपणास्र आणि ड्रोनचे हल्ले रशियन एअर डीफेन्स सिस्टीम S-400 परतवून लावले होते. या रशियन एअर डिफेन्स सिस्टीमचे उर्वरित स्क्वॉड्रन आता लवकरच भारताला मिळणार आहे. या बाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.

एस–400 एअर डिफेन्स सिस्टमचा चौथा आणि पाचवा स्क्वॉड्रनची डिलिव्हरी रशिया- युक्रेन युद्धामुळे रखडली होती. अलिकडेच चीनमध्ये किंगदाओ मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह आणि एंड्री बेलौसेव्ह यांच्यात या संदर्भात द्विपक्षीय बैठकीत चर्चा पार पडली. रशियाने गुरुवारी आश्वासन दिले की ते एस-400 एअर डिफेन्स सिस्टमच्या उर्वरित दोन स्क्वाड्रन साल 2026-27 मध्ये भारताला देणार आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये याच एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानला धुळ चारली होती.

पाच पैकी 3 एअर डिफेन्स सिस्टीमची डिलिव्हरी

या संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहीलय की, भारत -रशिया सहकार्याला अधिक मजबूत करण्या संदर्भात सार्थक चर्चा झाली 2018 मध्ये भारत आणि रशिया दरम्यान 40 हजार कोटी रुपयांच्या डीलवर हस्तांक्षर झाले होते. त्या अंतर्गत भारताला एस-400 चे 5 स्क्वॉर्डन साल 2023 च्या अखेर मिळणार होते. मात्र भारताला आतापर्यंत 3 स्क्वाड्रन मिळालेले आहे.टाईम्सच्या बातमीनुसार आता चौथी स्क्वाड्रन पुढच्या वर्षीपर्यंत तर पाचवी स्क्वाड्रन साल 2027 पर्यंत मिळणार आहे.

एस-400 का आहे महत्वाचे ?

एस-400 च्या प्रत्येक एका स्क्वाड्रनमध्ये दोन मिसाईल बॅटरी असतात. त्यात 128 मिसाईल असतात. या मिसाईल 120, 200, 250 आणि 380 किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहेत. यासोबत लांबपल्ल्याचं रडार सिस्टीम आणि कोणत्याही हवामानात चालणारा ट्रान्सपोर्ट व्हेईकल देखील असते.भारतीय वायूसेनेत आधीच तीन एस-400 स्क्वाड्रन असून त्यांना चीन आणि पाकिस्तान विरोधात उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारत सीमेवर तैनात केलेले आहे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.