चीनने जगाची झोप उडवली, चायनामध्ये आतापर्यंतचा सर्वात विनाशकारी प्रयोग; काही मिलीसेंकदांमध्येच सर्व काही संपणार
चीनच्या सैन्यांनी लॅबमध्ये आतापर्यंतचा सर्वात घातक प्रयोग केला आहे. या प्रयोगामुळे जगाची झोप उडाली असून, नव्या शोधामुळे चीनची ताकद प्रचंड वाढली आहे.

चीनच्या सैन्यांनी लॅबमध्ये आतापर्यंतचा सर्वात घातक प्रयोग केला आहे. पीएलएच्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच ‘ट्रिपल -न्यूक्लियर स्ट्राइक’ करून दाखवला आहे. या प्रयोगामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे. चीनच्या या नव्या शोधाने न्यूक्लियर शस्त्रांना अधिक घातक बनवले आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एका न्यूक्लिअर हल्ल्यामुळे जेवढं नुकसान होतं, त्यांच्या तिप्पट नुकसान आता एकाचवेळी होणार आहे.चीनने बंकर नष्ट करण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान विकसीत केलं आहे, असं म्हटलं जातं आहे. मात्र यामुळे अमेरिकेच्या विचारसरणीला मोठा धक्का बसला आहे. जगात अण्वस्त्रांवर नियंत्रण यावं यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र चीनच्या या नव्या प्रयोगामुळे आता अमेरिकेचं देखील टेन्शन वाढलं आहे.
चीनच्या नैनजिंग या शहरात असलेल्या आर्मी इंजिनियरिंग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला आहे. चीनचा हा नवा शोध Explosion and Shock Waves या जर्नलमध्ये पब्लिश करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार चीनी वैज्ञानिकांना हे माहिती करून घ्यायचं होतं की, जर एकाच ठिकाणी एकाचवेळी तीन छोटे अणू हल्ले केले तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? त्यानंतर आर्मी इंजिनियरिंग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या प्रयोगाचं एक छोटं मॉडेल तयार करून एका मर्यादीत क्षमतेपर्यंत या प्रयोगाची यशस्वी चाचणी केली. या टीमने व्हॅक्यूम चेंबर आणि टू स्टेज, उच्च-दाब गॅस गन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून, हा प्रयोग केला आहे.
काही मिलिसेकंदांमध्ये मोठा विनाश
Explosion and Shock Waves मध्ये पब्लिश करण्यात आलेल्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की, या नव्या प्रयोगामुळे अवघ्या काही मिलिसेकंदांमध्ये मोठा विनाश घडवू शकतो. या नव्या प्रयोगाने एका अण्वस्त्रांचा स्फोट घडवून आणण्यासाठी अवघे 0.8 मिलिसेंकदांचा वेळ लागतो, ‘ट्रिपल -न्यूक्लियर स्ट्राइक’ मध्ये तीनही अण्वस्त्रांचा स्फोट एका मागून एक लगेच होत असल्यामुळे अवघ्या काही मिलिसेकंदांमध्ये मोठा विनाश घडवून आणला जाऊ शकतो. थोडक्यात काय तर अण्वस्त्राच्या एका स्फोटामुळे जेवढं नुकसान होणार आहे, त्याच्या तिप्पट नुकसान चीनने बनवलेल्या या नव्या प्रयोगामुळे होणार आहे.
