‘संपूर्ण जग…’ पहलगामचा मास्टरमाईंड सैफुल्लाह कसूरीने भारताविरोधात ओकली गरळ
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाह कसूरी याने भारताविरोधात पाकिस्तानात रॅली काढली. त्यावेळी त्याने पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला आणि भारताविरोधात गरळ ओकली. काय म्हणाला हा दहशतवादी?

लष्कर ए तैयब्बाचा कमांडर सैफुल्लाह कसुरी याने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली. त्याने पाकिस्तानात नुकतीच भारताविरोधात रॅलीचे आयोजन केले होते. त्याने पाकिस्तानातील प्रमुख नेत्याना एकाच मंचावर आणले आणि भारताविरोधातील सूर आळवला. कसूरी हाच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे मानण्यात येते. त्याने हल्ल्यानंतर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्याने आपण या हल्ल्यामागे नसल्याचा दावा केला होता. पण आता कसूरीने त्याचा खरा रंग दाखवला.
हाफिज सईदाचा मुलगा पण हजर
पाकिस्तान मकरजी मुस्लिम लिगने ही रॅली आयोजित केली होती. यामध्ये दहशतवादी हाफिज सईद याचा मुलगा तल्हा सईद हा पण सहभागी झाला होता. यावेळी कसूरीने भारताविरोधात गरळ ओकली. “मला पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार धरण्यात आले. आता माझे नाव जगभर झाले आहे. आता मी जगात प्रसिद्ध झालो आहे.” असे कसूरी म्हणाला. तर दहशतवादी मुदासिर अहमद हा ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेला होता. त्याच्या नावाने रुग्णालय सुरू करणार असल्याचे कसूरी म्हणाला.
तल्हाने दिल्या भारतविरोधी घोषणा
भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीत 32 व्या क्रमांकावरील दहशतवादी तल्हा सईद हा पण या रॅलीत सहभागी झाला होता. त्याने भाषणाची सुरुवात नारा-ए-तकबीर याने केली. तल्हा याने भारतविरोधी घोषणा दिल्या. या रॅलीत पाकिस्तानातील मोठे नेते सहभागी झाले होते. अनेक दहशतवादी हे पाकिस्तानच्या निवडणुकीत उमेदवार होते. पण ते या निवडणुकीत विजयी झाले नाहीत.
पाकिस्तान हा दहशतवादाचा गड
पाकिस्तान हा दहशतवाद्यांना अनेक वर्षांपासून पैसा पुरवत आहे. त्यात त्याचे पण नुकसान झाले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्र्यांनी सुद्धा त्याची कुबली दिली आहे. पाक कित्येक वर्षांपासून दहशतवाद्यांना पोसत आहे. आता पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकला योग्य संदेश दिला. या मोहिमेत पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील 100 हून अधिक दहशतवादी मारल्या गेले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणी हल्ला केला. त्यात हे दहशतवादी ठार झाले होते.
