येथे तीन दिवसांचा विक ऑफ, केवल चार दिवसच काम करा, कुठे लागू झाला हा नियम पाहा
एकीकडे भारतात कामाचे तास वाढवण्यावरुन विविध उद्योजक नवनवीन सल्ले देत असताना जगभरातील विकसित देशात वर्क-लाईफ बँलन्ससाठी कामगारांच्या आठवड्याच्या सुट्ट्या वाढविल्या जात आहेत.

भारतात सर्वसाधारणपणे नोकरदारांना सहा दिवसांचा आठवडा आहे. केवल मोजक्या शहरात आणि संस्थामध्ये पाच दिवसांचा आठवडा असून दोन दिवस सुट्टी दिली जाते. परंतू जगात काही ठिकाणे अशी देखील आहेत. जेथे आठवड्यातून चार दिवसच काम करावे लागते. असाच चार दिवसांचा आठवडा आता भारतीयांचे सध्याचे आवडते पर्यटन ठिकाण असलेल्या शहरात लागू झाला आहे. या देशात अनेक भारतीय राहात आहेत अनेक श्रीमंतांचे सेकंड होम या देशात आहे.
दुबई संदर्भात आपण बोलत आहोत. दुबईतील सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता तीन विकेण्डचा लाभ मिळणार आहे. येथे आता चार दिवसच काम करावे लागणार आहे.कारण जागतिक स्तरावर आता 4 ‘वर्क डे’चे प्रचलन वाढत आहे. दुबईत उन्हाळ्यात लोकांचे वर्क-लाईफ बॅलन्सला पाहाता 4 ‘वर्क डे’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या उन्हाळ्याच्या सीझन पुरती व्यवस्था
न्यूयॉर्क पोस्टच्या नुसार, 4 दिवसांचा आठवडा करण्याचा नियम सध्या उन्हाळ्याच्या दिवसांपूरता लागू केला आहे. हा निर्णय 1 जुलै पासून सुरु होऊन 12 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे असे दुबई सरकारच्या मानव संसाधन (DGHR) विभागाने म्हटले आहे.
काही लोकांना 3 दिवस तर काहींना 2.5 दिवसाचा वीक ऑफ
या योजनेनुसार सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची विभागणी करण्यात आली आहे. त्यांना वेगवेगळ्या फ्लेक्सिबल वर्क शेड्यूलमध्ये ठेवण्यात आले आहे. पहिल्या गटातील लोक सोमवार ते गुरुवारपर्यंत प्रतिदिन 8 तास काम करतील. तसेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार त्यांना सुट्टी दिली जाणार आहे. दुसऱ्या गटातील कर्मचाऱ्यांना सोमवार ते गुरुवारपर्यंत दररोज 7 तास काम करावे लागेल आणि शुक्रवारीही 4.5 तास काम करावे लागेल. यांना शुक्रवारी हाफ डे आणि शनिवार – रविवार सुट्टी मिळेल.
गेल्यावर्षी दुबईत याचा पायलट प्रोग्रॅम लागू झाला
दुबई सरकारने गेल्यावर्षी याचा यशस्वी पायलट प्रोग्रॅम लागू केला होता. नंतर टप्प्या टप्प्याने हा नियम सर्वांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेनंतर कर्मचाऱ्यांच्या समाधानात आणि आनंदात वाढ झाली. तसेच उत्पादकतेतही वाढ झाली. डीजीएचआरचे महासंचालक अब्दुल्ला अली बिन जायद अल फलासी यांनी सांगितले की हे धोरण आधुनिक कार्यबल तयार करण्याचा सरकारचा उद्देश्य प्रदर्शित करीत आहे.हा केवळ कामाच्या तासातील बदल नाही तर सरकारची बदलती मानसिकता दर्शवत आहे, जी संस्थागत दक्षतेसह कर्मचाऱ्यांच्या कल्याणाही देखील महत्व देत आहे.
3 वीक ऑफ वर्क-लाईफ बँलन्ससाठी गरजेचे
जगभरात चार दिवसाचा आठवड्यांचे चलन वाढले आहे. कामगारांच्या कल्याणासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. ऑस्ट्रेलिया, जपान, ब्रिटेन, कॅनडा, आयरलँड, अमेरिका आणि आइसलँड सारखे काही देश आहेत.जे कामाचे तास कमी करण्याचा प्रयोग करीत आहेत.
वर्क-लाईफ बँलन्सने प्रोडक्टीव्हीटी
कंपन्याद्वारा चार दिवसांच्या आठवडा लागू करण्याच्या सामान्य प्रकारांपैकी एक 100:80:100 मॉडलचा उपयोग करणे हे आहे.ज्यात कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन 100% मिळत आहे. परंतू त्यांचे कामाचे तास 80% पर्यंत कमी केले जात आहेत. परंतू या नव्या परिवर्तनाला यशस्वी बनवण्यासाठी त्यांना आपली उत्पादकता 100 टक्के राखावी लागणार आहे.
