ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टेरिफ बॉम्ब… इराकवर 30%, तर फिलीपाईन्सवर लावला 25% कर
एक दिवस आधीच अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने दक्षिण कोरिया आणि जपानसह १४ देशांवर टेरिफ लागू केले असतानाच आज अमेरिकेने इराक आणि फिलीपाईन्सवर हा आयात कर लागू केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अनेक देशांविरोधात टेरिफ कर लागू करण्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेने फिलीपाईन्सवर २५ टक्के, इराकवर ३० टक्के, मॉल्डोवावर २५ टक्के टेरिफ कर लागू करणार आहे. जो एक ऑगस्ट पासून लागू होणार आहे. याच सोबत अमेरिकेच्यावतीने अल्जेरियावर ३० टक्के, लिबियावर ३० टक्के आणि ब्रुनेईवर २५ टक्के टेरिफ लावण्यात आला आहे.
अमेरिकेने लावलेला टेरिफ कर ( व्यापार कर )
फिलीपाईन्स: 25%
ब्रुनेई: 25%
अल्जेरिया: 30%
मोल्दोवा: 25%
इराक: 30%
लिबिया: 30%
डोनाल्ड ट्रम्प यांनी या देशांच्या नेत्यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रात टेरिफची डिटेल्स पाठवली आहे. टेरिफचा सर्वात जादा कर ३० टक्के असून तो इराक, अल्जेरिया आणि लिबियावर लागू करण्यात आले आहे. या सहा देशांवर आज टेरिफ लागू करण्याचा निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे कालच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साऊथ कोरिया आणि जपानसह १४ देशांवर टेरिफ लागू केला होता.
१४ देशांवर लावला होता टेरिफ कर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ जुलै रोजी १४ देशांवर नवीन टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे भारतातील निर्यातदारांना अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कापड आणि विद्युत यंत्रसामग्रीसारख्या क्षेत्रात निर्यात वाढवण्याची संधी मिळू शकते असे म्हटले जात आहे. अमेरिकेने भारतावरही २६ टक्के टेरिफ लावला होता. मात्र त्याला ९ जुलैपर्यंत स्थगिती दिली होती.
