AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk : एलन मस्कला ट्विटरची कायदेशीर नोटीस, नॉन डिक्लोजर कराराचा मस्ककडून भंग, ट्विटरचा आरोप

मस्कच्या ट्विटर डीलला काही काळ स्थगिती दिल्याची माहिती समोर आल्यानंतर ट्विटरच्या स्टॉकमध्ये जवळपास 10 टक्के घसरण झाली आहे.

Elon Musk : एलन मस्कला ट्विटरची कायदेशीर नोटीस, नॉन डिक्लोजर कराराचा मस्ककडून भंग, ट्विटरचा आरोप
एलॉन मस्कImage Credit source: tv9
| Updated on: May 15, 2022 | 4:54 PM
Share

मुंबई :  इलॉन मस्क (Elon Musk) मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरसोबतचा (Twitter) करार शेवटच्या टप्प्यात असतानाच तो अडकला आहे. मस्कला कायदेशीर अडचणींचा आता सामना करावा लागणार आहे. मस्क यांनी शनिवारी ट्विट (Tweet) करून याबाबत माहिती दिली आहे. तो म्हणाला की ट्विटरच्या कायदेशीर टीमने त्याच्यावर नॉन-डिस्कलोजर कराराचे (NDA agreement) उल्लंघन केल्याचा आरोप माझ्यावर लावण्यात आला आहे.’ मस्कच्या या ट्विटनंतर जगभरातल्या नजरा ट्विटरकडे वळल्या आहेत. मस्कने ट्विट केले, “ट्विटरच्या कायदेशीर टीमनं कळवलं की मी बोट चेक नमुन्याचा आकार 100 असल्याचं उघड करून नॉन-डिक्लोजर कराराचा भंग केला आहे.” इलॉन मस्क यांनी अलीकडेच सांगितलं की, जोपर्यंत बनावट खात्यांचा डेटा मिळत नाही तोपर्यंत हा करार स्थगित ठेवण्यात आला आहे. मस्कच्या ट्विटर डीलला काही काळ स्थगिती दिल्याची माहिती समोर आल्यानंतर ट्विटरच्या स्टॉकमध्ये जवळपास 10 टक्के घसरण झाली आहे. मस्कने काही दिवसांपूर्वी ट्विटरला 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार केला होता.

नेमकं काय झालं?

एका फाइलिंगमध्ये Twitter नं म्हटलंय की, ‘2022 च्या पहिल्या तिमाही कमाई केलेल्या सक्रिय वापरकर्त्यांमध्ये (mDAUs) स्पॅम खात्यांची (बॉट्स) संख्या 5 टक्क्यांपेक्षा कमी होती. कंपनीनं असंही म्हटलंय की हा केवळ अंदाज आहे आणि स्पॅम खात्यांची संख्या जास्त असू शकते. यानंतर मस्क म्हणाले होते की, ‘ट्विटरवरील स्पॅम किंवा बनावट खाती खरोखर 5 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. त्याच्या अचूक गणनाचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. जोपर्यंत डेटा मिळत नाही तोपर्यंत करार स्थगित ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

44 अब्ज डॉलर्सचा करार

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची घोषणा केली होती. या वर्षी हा करार पूर्ण होईल, असे सांगितले जात होते. त्यानंतर ट्विटरवर इलॉनचे पूर्ण नियंत्रण असेल आणि ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे ते थांबवण्यात आले आहे. एलन मस्क यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडिया कंपनी ट्विटरच्या शेअर्समध्ये 20 टक्के घसरण झाली होती. पहिल्या तिमाहीत कमाई केलेल्या सक्रिय वापरकर्त्यांपैकी 5 टक्के पेक्षा कमी खोट्या किंवा स्पॅम खाती आहेत. मात्र, सध्याच्या हलचाली पाहता ट्विटरमध्ये सध्या तरी बरंच काही बिघडल्याचं दिसतंय.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.