America-Pakistan : ट्रम्पनी जवळ केलं म्हणून हवेत उडणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेकडून मोठा झटका, भारताचा फायदा, मुनीर ब्रिगेडची निघाली इज्जत
America-Pakistan : डोनाल्ड ट्रम्प यांनी लंचला बोलावलं म्हणून पाकिस्तान खूप हवेत उडत होता. मुनीर ब्रिगेडला आकाश ठेगणं झालेलं. आता त्याच अमेरिकेने पाकिस्तानची इज्जत काढली आहे, ते ही परिपत्रक काढून. त्यांना मोठा झटका दिला आहे.

अलीकडे अमेरिकेने पाकिस्तान बरोबर जवळीक वाढवली होती. त्यामुळे पाकिस्तानात हवेत होता. आता अमेरिकेनेच त्यांना जमिनीवर आणलय. भारताविरोधात फक्त पाकिस्तानचा वापर सुरु होता. आता हे मुनीर ब्रिगेडला समजेल. दोनएक दिवसांपूर्वी बातमी आलेली की, अमेरिकेने पाकिस्तानला Advance AIM-120 एयर-टू-एयर मिसाइलच्या (AMRAAMs) विक्रीला परवानगी दिलीय. अमेरिका हवेतून हवेत मारा करणारी AIM-120 मिसाइल देणार असा पाकिस्तानने दावा केला होता. पण अमेरिकेने पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या प्रोपेगंडा प्रचाराला खोटं ठरवलय. पाकिस्तानला अमेरिका AIM-120 एयर-टू-एयर मिसाइल देणार हे वृत्त अमेरिकेने प्रसिद्धीपत्रक काढून फेटाळून लावलय.
अमेरिकेने संरक्षण व्यवहाराचे नियम बदलले आणि आम्हाला मिसाइल देण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला असा पाकिस्तानने दावा केला होता. आता अमेरिकेच्या वॉर विभागाने हा दावा फेटाळून लावलय. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांनी ट्रम्प यांच्यासोबत बैठक झाल्यानतंर पाकिस्तानने ही अफवा पसरवलेली. अमेरिकन सरकारने स्टेटमेंट काढून हे वृत्त फेटाळून लावलय. हे एक प्रकारे पाकिस्तानची इज्जत निघण्यासारखं आहे.
त्यात अनेक देशात पाकिस्तान सुद्धा आहे
अमेरिकी दूतावासाने एक अधिकृत स्टेटमेंट जारी करुन हे रिपोर्ट फेटाळून लावले आहेत. स्पष्टपणे म्हटलय की, ज्या सुधारणा केल्यात त्यात कुठेही पाकिस्तानची सध्याची क्षमता वाढवलेली नाही, म्हणजे पाकिस्तानला एडवांस्ड मीडियम-रेंज एयर-टू-एयर मिसाइलचा (AMRAAMs) पुरवठा होणार नाही. अमेरिकेच्या वॉर विभागाने 30 सप्टेंबर 2025 रोजी एक लिस्ट जारी केलेली. त्यात अनेक देशात पाकिस्तान सुद्धा आहे. काही जुन्या संरक्षण करारात बदल करण्यात आलेले. हा बदल देखभाल आणि सुट्टया भागांच्या पुरवठ्याशी संबंधित होते.
US Embassy in India issues a clarification on media reports of missile sales to Pakistan. It states, “The sustainment does not include an upgrade to any of Pakistan’s current capabilities.” pic.twitter.com/zILlcs8QJD
— ANI (@ANI) October 10, 2025
F-16 फायटर जेट्सची क्षमता वाढणार होती.
अमेरिकी प्रशासनाने स्पष्ट केलय की, पाकिस्तानला कुठलीही एडवांस्ड मीडियम-रेंज एयर-टू-एयर मिसाइल (AMRAAM) देण्यात येणार नाहीत. हा करार फक्त विद्यमान मिसाइल सिस्टिमची देखभाल आणि दुरुस्तीसाठी आहे. पाकिस्तानची सैन्य क्षमता वाढवण्यासाठी नाही.
मागच्या काही दिवसात विविध मीडिया आउटलेट्समध्ये बातम्या आलेल्या की, पाकिस्तानला अमेरिकेकडून AIM-120 AMRAAM मिसाइल मिळणार आहे. यामुळे त्यांच्या F-16 फायटर जेट्सची क्षमता वाढणार होती. क्षेत्रीय हवाई संतुलन यामुळे बिघडलं असतं.
