AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tariff War : ट्रम्प यांचं ऐकून भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली, तर त्याचे काय-काय परिणाम होतील?

Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यासाठी त्यांनी रशियाकडून तेल खरेदीच कारण दिलं आहे. उद्या जर ट्रम्प यांचं ऐकून भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली, तर त्याचे काय परिणाम होतील, हे समजून घेणं आवश्यक आहे.

Tariff War : ट्रम्प यांचं ऐकून भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली, तर त्याचे काय-काय परिणाम होतील?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2025 | 5:42 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. हा टॅरिफ लावण्यामागे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी रशियन तेल खरेदीचं कारण पुढे केलं आहे. भारत रशियाकडून तेल विकत घेतो, त्यामुळे रशियाला युक्रेन विरुद्ध युद्ध चालू ठेवण्यासाठी बळ मिळतं, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. वास्तविक भारतच नाही, तर चीन सुद्धा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. पण चीनवर डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लावलेला नाही. उलट ट्रम्प यांनी काल चीनवरील टॅरिफ सस्पेंशनची मुदत 90 दिवसांनी वाढवली. एखाद्याबद्दल व्यक्तीगत खून्नस असतो, तसं सध्या ट्रम्प यांचं भारतासोबतच वागणं आहे. ट्रम्प यांचं ऐकून उद्या जर भारताने रशियाकडून कच्चा तेलाची खरेदी बंद केली, तर त्याचे काय परिणाम होतील? जाणून घ्या.

भारत आणि चीनने अमेरिकेच ऐकून रशियाकडून तेल खरेदी बंद केली, तर कच्चा तेलाच्या किंमती 150 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे ग्लोबल इकोनॉमीला मोठं नुकसान होईल. राजकीय जाणकार फरीद जकारिया यांचं हे विश्लेषण आहे. एका इंटरव्यूमध्ये फरीद जकारिया यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर कडाडून टीका केली.

अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ किती तारखेपासून लागणार?

अमेरिकेच मागच्या 25 वर्षांपासून जे परराष्ट्र धोरण होतं, डोनाल्ड ट्रम्प हे त्याच्या बिलकुल उलट चालत आहेत. मागच्या 25 वर्षात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारतासोबत रणनितीक आणि आर्थिक संबंध मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला. रशियाकडून तेल खरेदीसाठी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ येत्या 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांचं म्हणण तर्कहीन आहे, कारण भारतापेक्षा चीन रशियाकडून जास्त तेल विकत घेतो.

भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर काय होईल?

“डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय सामानाच्या आयातीवर 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या घेतलेल्या निर्णयाला अर्थ नाही. याने अमेरिकेत अनेक लोक हैराण झालेत” असं राजकीय एक्सपर्ट आणि लेखल फरीद जकारिया म्हणाले. भारत आणि चीनने रशियन तेल खरेदी बंद केली तर कच्चा तेलाच्या किंमती 150 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात. त्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसेल असं जकारिया यांचं म्हणणं आहे.

ट्रम्प यांचं काय चुकतय?

“ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय म्हणजे मागच्या 25 वर्षातील अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील मोठा बदल आहे. यामुळे अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध अजून बिघडतील. ट्रम्प जे करतायत ते हैराण करणारं आहे. शीत युद्धानंतर क्लिंटन प्रशासनाने अमेरिका आणि भारताची दृढ् मैत्रीच धोरण ठरवलेलं” असं जकारिया यांनी सांगितलं.

मागच्या दोन दशकात अमेरिकेच्या प्रत्येक प्रशासनाने भारतासोबत मजबूत संबंध बनवण्याचं काम केलं. आशिया खंडातील महत्त्वाचा सहकारी म्हणून भारताकडे पाहिलं. ट्रम्प आता बिलकुल या उलट वागत आहेत.

असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.