AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकन नौदलाला मोठा धक्का, अरबी समुद्रात थेट कोसळले हेलिकॉप्टर, आपत्कालीन..

इराण आणि अमेरिका युद्ध गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होते. अखेर दोन्ही देशात युद्धविराम करार झाले. यादरम्यानच आता अमेरिकेच्या नाैदलाला मोठा झटका बसला आहे. त्यांचे हेलिकॉप्टर थेट अरबी समुद्रात कोसळले आहे.

अमेरिकन नौदलाला मोठा धक्का, अरबी समुद्रात थेट कोसळले हेलिकॉप्टर, आपत्कालीन..
MH 60 helicopter
| Updated on: Jul 02, 2026 | 9:07 AM
Share

अमेरिकेच्या लष्कराला मोठा धक्का बसलाय. अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करत असताना अमेरिकन नौदलाचे MH-60S सीहॉक हेलिकॉप्टर कोसळले.अरबी समुद्रात लँडिंग करणे महागात पडले. या अपघातानंतर 3 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले. मात्र, अजून एकजण बेपत्ता आहे. या घटनेने अमेरिकन लष्कराला धक्का बसला. अमेरिकन लष्कराने बुधवारी एक निवेदनाद्वारे ही माहिती दिली. अमेरिकेच्या लष्कराने यावर स्पष्ट केले की, ही घटना कोणत्याही शत्रुच्या हल्ल्यामुळे अजिबात घडली नाही. हेलिकॉप्टर यूएसएस जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश या विमानवाहू नौकेवर तैनात होते.  यादरम्यान ही घटना घडली. 1 जुलैच्या पहाटे 3.30 वाजता ही घडला घडली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये 4 कर्मचारी तैनात होते. या घटनेनंतर तीन कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, अजूनही एक कर्मचारी बेपत्ता आहे. त्याचा शोध अमेरिकन लष्कराकडून घेतला जात आहे.

बेपत्ता कर्मचाऱ्याची कोणतीही माहिती मिळत नाहीये. त्याचा शोध घेण्यासाठी एक पथकही तयार करण्यात आले. सीहॉक हे दोन इंजिने असलेले हेलिकॉप्टर आहे. लष्करी मोहिमा, शोध व बचाव कार्ये, पाणबुडी-विरोधी युद्ध आणि मालवाहू करिता याचा वापर केला जातो. अनेक वर्षांपासून हे हेलिकॉप्टर अमेरिकेच्या लष्करात आहे.

मोहिमेवर असताना या हेलिकॉप्टरची पत्कालीन लँडिंग अरबी समुद्रात करण्यात आली. मात्र, त्यानंतर भयंकर घडले. इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेच्या लष्कराने आपली ताकद दाखवली होती. इराणच्या लष्कराने अमेरिकेचे एक लढाऊ विमान पाडले होते. ज्यानंतर अमेरिकेने इराणच्या तोंडातून आपल्या सैनिकांना सुरक्षित बाहेर काढले.

इराण आणि अमेरिका यांच्यात तब्बल 3 महिने युद्ध सुरू होते. अखेर मोठ्या संघर्षानंतर हे युद्ध थांबले. यादरम्यान इराणभोवती अमेरिकेने मोठी नाकेबंदी केली होती. अखेर दोन्ही देशात युद्धविराम करार झाले असून अमेरिकेने इराणभोवतीची नाकेबंदी हटवली आहे. होर्मुज खाडीही सुरू करण्यात आले. ज्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर झाल्या आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली होती.

Follow Us
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप