AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Vijay : बाबा मला आणायला येणार होते, पण..मुख्यमंत्री विजय यांचा मुलगा पहिल्यांदाच किडनॅपिंगच्या त्या घटनेबद्दल बोलला

CM Vijay : बऱ्याच वर्षांनी तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांभोवतीच फिरणाऱ्या तामिळनाडूच्या राजकारणात आता TVK च्या रुपाने नव्या पक्षाची एन्ट्री झाली आहे. या TVK चे सर्वेसर्वा आहेत अभिनेते थलपती विजय. त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात यशस्वी पाऊल टाकलं आहे.

| Updated on: Jul 02, 2026 | 8:56 AM
Share
मुख्यमंत्री बनल्यापासून विजय यांच्या राजकीय निर्णयांची जितकी चर्चा होते, तितकच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोललं जातं. विजय यांचं लग्न झालेलं असलं तरी त्यांचं नाव अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत जोडलं जातं. विजय यांची पत्नी संगीता सोरनालिंगम यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात खटला दाखल केला आहे.

1 / 5
विजय यांना इन्स्टाग्रावर  त्यांच्या मुलाने जेसन संजयने अनफॉलो केल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. काहींनी असही म्हटलं की मुलाने विजय यांना इन्स्टावर कधी फॉलोच केलं नाही. आता एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात जेसन संजय वडिलांच्या एका चाहत्याने त्याला किडनॅप केल्याचा गंमतीशीर किस्सा सांगताना दिसतोय.

2 / 5
जेसन संजयचा हा व्हिडिओ डाऊनलोड करुन चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केला. जेसन एक मुलाबरोबर बोलताना त्याला बालपणीचा शाळेतला किस्सा सांगत होता. बाबा मला शाळेत नेण्यासाठी येणार होते. पण त्याआधीच कोणीतरी माझं अपहरण केलय असं मला वाटलं असं जेसन त्या व्हिडिओमध्ये एका मुलाला सांगताना दिसतोय.

3 / 5
ज्या माणसाने मला उचलून घेतलेलं, तो माझ्या वडिलांचा निस्सीम चाहता होता. त्याला काहीही करुन विजय यांना पहायचं होतं. तो मला घेऊन चाललेला. मला वाटलं की, माझं अपहरण होतय. म्हणून मी त्याच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करत होतो. पण विजय यांची कार आल्यानंतर त्या माणसाने मला मागच्या सीटवर बसवल्याची आठवण जेसन संजयने सांगितली.

4 / 5
वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून जेसन संजय सुद्धा चित्रपट सृष्टीत पदार्पण करतोय पण तो डायरेक्टर म्हणून सुरुवात करणार आहे. घटस्फोटाच्या खटल्यामुळे विजय आणि जेसन संजय यांच्यात जमत नाही असं बोललं जातं. विजय यांच्या आयुष्यात आता त्रिशा कृष्णन आहे.

5 / 5
Follow Us
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता