झेलेन्स्की यांचा खेळ संपणार, सत्तापालटासाठी ट्रम्प यांनी मोठी खेळी, 4 अमेरिकी दूत करणार कमागिरी फत्ते
Russia-Ukraine: रशियाने बुधवारी रात्री युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या मूळ गावी असलेल्या क्रीवी रीह येथे एका हॉटेलला लक्ष्य केले. क्षेपणास्त्राने केलेल्या या हल्ल्यात किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Russia-Ukraine: अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोल्दोमीर झेलेन्स्की यांच्यात जोरदात ‘तू तू मै मै’ झाली होती. ते दृश्य संपूर्ण जगाने पाहिले होते. त्यानंतर झेलेन्स्की यांना युरोपचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे ट्रम्प यांनी यूक्रेनमध्ये सत्तापलटवण्यासाठी कंबर कसली आहे. ट्रम्प यांनी त्यांचे चार अधिकारी युक्रेनमध्ये पाठवले आहे. ते जेलेंस्की यांना विरोध करणाऱ्या लोकांची भेट घेणार आहेत. युक्रेनमध्ये लवकर निवडणूक करण्यासाठी ते पावले उचलणार आहेत. अमेरिका आणि रशिया युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करत असताना ट्रम्प यांच्याअधिकाऱ्यांनी झेलेन्स्की यांची भेट घेतली.
विरोधी नेत्यांनी चर्चा
रिपोर्टनुसार, ट्रम्पच्या चार अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या विरोधी नेत्या युलिया टिमोशेन्को आणि पेट्रो पोरोशेन्को यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चे केली. ट्रम्प अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या नेत्यांना विचारले की येथे निवडणुका कधी व्हाव्यात आणि त्यासाठी काय करावे लागेल? युक्रेनने अलीकडेच पोरोशेन्को यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. पोरोशेन्को हे यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. झेलेन्स्की यांनी निवडणुकीत पोरोशेन्को यांचा पराभव केला होता. युक्रेनमध्ये लवकरच निवडणुका झाल्या, तर झेलेन्स्की यांना या निवडणुकीत युद्ध गुन्हेगार असल्याचा प्रचार करुन त्यांचे नुकसान करता येईल, असे ट्रम्प यांच्या मित्रपक्षांचे मत आहे.
का होत नाही निवडणुका?
राशिया आणि युक्रेन दरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू आहे. शांतता करार होईपर्यंत आणि युक्रेन पुन्हा रुळावर येईपर्यंत येथे निवडणुका होणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. झेलेन्स्की म्हणतात की मतदान केलेल्या बहुतेक लोकांनी एकतर इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे किंवा युद्ध आघाडीवर तैनात आहेत. त्यामुळे निवडणुका घेता येणार नाही. युक्रेनमध्ये 2019 मध्ये मध्यवर्ती निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर झेलेंस्की यांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपत आहे.
रशियाकडून पुन्हा युक्रेनवर हल्ला
रशियाने बुधवारी रात्री युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या मूळ गावी असलेल्या क्रीवी रीह येथे एका हॉटेलला लक्ष्य केले. क्षेपणास्त्राने केलेल्या या हल्ल्यात किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्याचे प्रयत्न सुरु असताना हा हल्ला झाला आहे.
