AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उड्डाण करताच 235 लोकांचा जीव धोक्यात, विमानाने घेतला पेट, पहा VIDEO

डेल्टा एअरलाइन्सच्या DL-446 या विमानाच्या इंजिनने उड्डाण करताच पेट घेतल्याचे समोर आले आहे. या विमानात 235 प्रवासी आणि क्रु मेंबर्स प्रवास करत होते.

उड्डाण करताच 235 लोकांचा जीव धोक्यात, विमानाने घेतला पेट, पहा VIDEO
Plane Fire
| Updated on: Jul 20, 2025 | 3:04 PM
Share

गेल्या महिन्यातील अहमदाबाद विमान अपघातात 270 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. आता अमेरिकेत या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. डेल्टा एअरलाइन्सच्या DL-446 या विमानाच्या इंजिनने उड्डाण करताच पेट घेतल्याचे समोर आले आहे. हे विमान लॉस एंजेलिसवरून अटलांटाला जात होते. या विमानात 235 प्रवासी आणि क्रु मेंबर्स प्रवास करत होते. विमानाला आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

विमानाच्या इंजिनला लागली आग

समोर आलेल्या माहितीनुसार उड्डाण करताच बोईंग 767-400 या विमानाच्या इंजिनला आग लागली. हे विमान आकाशात झेपावत असताना जमिनीवरील लोकांना विमानाच्या इंजिनमधून आग बाहेर पडताना दिसली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात इंजिनमधून जोरदार आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत आहेत. या विमानाला आग लागताच लॉस एंजेलिस विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

पायलटमुळे वाचला जीव

विमानाला आग लागल्याचे समजताच पायलटने ‘मेडे’ कॉल करत विमानतळाला माहिती दिली. त्यानंतर पायलटने विमानाची दिशा बदलली आणि आपत्कालीन लँडिंगची तयारी केली. यानंतर विमान धावपट्टीवर उतरले. विमान उतरल्यानंतर अग्निशमन दल आणि बचाव पथकाने इंजिनला लागलेली आग विझवली. पायलटच्या सतर्कतेमुळे विमानातील सर्व 226 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्सचा जीव वाचला आहे.

अपघाताच्या चौकशीला सुरूवात

लॉस एंजेलिसवरून अटलांटाला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनला आग का लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने या अपघाताची चौकशी सुरु केली आहे. हे अपघातग्रस्त विमान 25 वर्षे जुने असल्याचे समोर आले आहे. आगामी काळात या अपघाताचे सविस्तर कारण समोर येणार आहे. त्यानंतर अपघातातील दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

लँडिंगनंतर आग नियंत्रणात

या विमानाच्या लँडिंगनंतर विमानाची आग नियंत्रण आणण्यास अग्निशामक दलाला यश आले आहे. यानंतर हे विमान दुसऱ्या वाहनाने ओढून तपासणीसाठी नेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.