Maria Corina Machado-Donald Trump : मला त्यांच्यावर…ट्रम्प यांना जिंकण्यासाठी महिला नेत्याने जे केलं त्याची जगभर चर्चा
Maria Corina Machado-Donald Trump : त्या बद्दल कॅरोलिन लीविट काही बोलल्या नाहीत. मचाडो यांनी ट्रम्प यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण बैठकीत काय होईल? या बद्दल कुठलीही पूर्वसूचना दिली नव्हती.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेने वेनेजुएलामध्ये घुसून सैन्य कारवाई केली. थेट वेनेजुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना कैद केलं. त्यानंतर आता वेनेजुएलामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, असा अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहे. वेनेजुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली. यावेळी मारिया कोरिना मचाडो यांनी आपला शांततेसाठी मिळालेला नोबेल पुरस्कार ट्रम्प यांना दिला. मचाडो ट्रम्प यांच्यासोबत देशाच्या भविष्याबद्दल बोलल्या. ‘राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासोबत चांगली बैठक झाली. आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकू शकतो’ असं मचाडो या बैठकीनंतर बोलल्या.
भेटी दरम्यान आपण आपलं नोबेल पुरस्कार पदक ट्रम्प यांना दिलं, असा मचाडो यांनी दावा केला. ट्रम्प यांनी तो पुरस्कार स्वीकारला का? याबद्दल मचाडो यांनी काही सांगितलं नाही. “वेनेजुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना भेटणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. ती एक अद्भुत महिला आहे. त्यांनी बरच काही सहन केलय. मी जी कामं केली, त्यासाठी मारियाने मला तिचा शांततेचा नोबेल पुरस्कार दिला. परस्परांमधील सन्मानाच हे एक अद्भुत उदाहरण आहे. धन्यवाद मारिया!” असं राष्ट्रपती ट्रम्प यांनी लिहिलय.
वेनेजुएलातील तेलावर नियंत्रण हे अमेरिकेचं पहिलं लक्ष्य
अमेरिकी प्रशासनाने वेनेजुएलामध्ये कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रोड्रिगेज यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मादुरो यांच्या शासनात रोड्रिगेज उपराष्ट्रपती होत्या. सध्या त्या वेनेजुएलाचा कारभार हाकत आहेत. मचाडो या वेनेजुएलाच्या जनतेच्या मजबूत आवाज आहेत असं व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लीविट यांनी म्हटलं आहे. योग्य वेळ पाहून ट्रम्प वेनेजुएलामधील नव्या निवडणुकांच समर्थन करतील. पण ही वेळ कुठली असेल? त्या बद्दल कॅरोलिन लीविट काही बोलल्या नाहीत. मचाडो यांनी ट्रम्प यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण बैठकीत काय होईल? या बद्दल कुठलीही पूर्वसूचना दिली नव्हती. कॅरेबियन सागरात अमेरिकी सैन्याने अजून प्रतिबंधित तेल टँकर ताब्यात घेतला. या टँकरचा वेनेजुएलाशी संबंध असल्याचं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे. वेनेजुएलातील तेलावर नियंत्रण हे अमेरिकेचं पहिलं लक्ष्य आहे.
