Video : सामान्य नागरिकाकडून पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा लाईव्ह अपमान!

सागर जोशी

|

Updated on: Feb 03, 2021 | 5:38 PM

पाकिस्तानचे पंतप्रधान हल्ली टीव्हीवरुन पाकिस्तानी जनतेशी संवाद साधत आहेत. अशाच एका संवादात एका सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकाने पंतप्रधान इम्रान खान यांचा खासप्रकारे अपमान केला आहे.

Video : सामान्य नागरिकाकडून पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा लाईव्ह अपमान!

नवी दिल्ली : पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती दयनीय झाली आहे याची माहिती क्वचितच कुणापर्यंत पोहोचली नसेल. पाकिस्तानात महागाईनेही परिसीमा ओलांडली आहे. रोजच्या खाण्यापिण्याची सामान खरेदी करणंही पाकिस्तानी लोकांना कठीण होऊन बसलं आहे. अशास्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान हल्ली टीव्हीवरुन पाकिस्तानी जनतेशी संवाद साधत आहेत. अशाच एका संवादात एका सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकाने पंतप्रधान इम्रान खान यांचा खासप्रकारे अपमान केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.(Pakistan’s Prime Minister Imran Khan insulted by a common man in a live show)

मुळचा पाकिस्तानी पण सध्या विदेशात राहत असलेल्या या नागरिकाला इम्रान खान यांच्या पक्षाकडून मोठी अपेक्षा होती. पण त्याची एकही अपेक्षा पूर्ण झाली नाही. या व्यक्तीने पंतप्रधान इम्रान खान यांना खास पद्धतीने देशातील नागरिकांच्या अवस्थेची माहिती दिली आणि इम्रान खान ऐकण्यापलीकडे काहीच बोलू शकले नाहीत.

‘इम्रान खान यांच्या पक्षाला देणगी दिली’

व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला टीव्ही अँकर संबंधित व्यक्तीला सांगतो की, ‘तुम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी बोलत आहात.’ त्यानंतर तो व्यक्ती इम्रान खान यांना नमस्कार करतो आणि बोलायला सुरुवात करतो. ‘मी तुमच्या पक्षाला मतदान केलं होतं. पक्षाला देणगीही दिली होती. मी तुमच्या पक्षाला मत देण्यासीठ सौदी अरबमधून आलो होतो. आता सर्वकाही खूप चांगल्याप्रकारे सुरु आहे. मी तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी फोन केला आहे.’

‘पाकिस्तानात सर्वजण खूश आहेत’

तो व्यक्ती पुढे म्हणतो की, ‘तुम्ही जनतेला आश्वासन दिलं होतं की, एक कोटी नौकऱ्या उपलब्ध करेन, आता पाकिस्तानमध्ये कुणीही बेरोजगार नाही. सर्वजण खूश आहेत. चीन, कोरिया आणि अमेरिकेतून लोक येत आहेत. विमानतळावर सौदी विमानतळावरुन कामगार येत आहेत. त्यांच्या विमानानेही लँड केलं आहे. तुम्ही 50 लाख घरांचं आश्वासन दिलं होतं, ते ही तुम्ही पूर्ण केलं. आता आपल्या पाकिस्तानात जी जुनी घरं आहेत ती रिकामी पडून आहेत. ते आता आम्ही कुणाला तरी भाड्याने देऊ आणि नव्या घरात राहायला जाऊ’.

‘पाकिस्तानमध्ये विकास जोरात’

तो व्यक्ती पुढे बोलतो की, ‘परदेशात राहत असलेले सर्व पाकिस्तानी खूप खुश आहेत. तिकीटही स्वस्त झाले आहे. वीज फुकट मिळत आहे. पेट्रोलचे भाव रोज कमी होत आहेत. पाकिस्तानचा विकास जोरात सुरु आहे. परदेशात पाकिस्तानची इज्जत वाढत आहे. आपल्या प्रयत्नांमुळे पाकिस्तान आता स्विर्त्झलँडपेक्षाही पुढे जात आहे. दुसरी बाब ही की तुम्ही ज्या कोंबड्या आम्हाला पाठवल्या होत्या त्यांनी अंडी देण्यास सुरुवात केली आहे.’

‘चंद्रावरील मोहीमेचीही तयारी’

इम्रान खान यांचा अपमान इथेच थांबला नाही. त्या व्यक्तीने पुढे बोलताना म्हटलं की,’ 350 धरणं बनली, शेतीचा विकास होत आहे. लोक खूपच खूश आहेत. सर्वजण तुम्हाला आर्शीवाद देत आहेत. आम्हाला माहिती मिळाली आहे की तुम्ही चांद्रमोहीमेची तयारी करत आहात. तिथे पाकिस्तानी नागरिकांसाठी एक कॉलनी निर्माण करणार आहात. आपल्या योजनांमुळे महागाई पूर्णपणे संपली आहे.’ अशा शब्दात या व्हायरल व्हिडीओमध्ये इम्रान खान यांचा अपमान सुरु असल्याचं पाहायला मिळतं. त्यावेळी इम्रान खान ऐकण्यापलीकडे काही करु शकत नव्हते.

संबंधित बातम्या :

मुलींना टाईट जीन्स, हायहिल्स घालण्यास बंदी; पाकिस्तानमधील विद्यापीठाचा गजब कारभार

पाकिस्तानच्या फरार दहशतवाद्यावर अमेरिकेकडून 21 कोटींचं इनाम, अफगाणिस्तानात असा झाला शेवट

Pakistan’s Prime Minister Imran Khan insulted by a common man in a live show

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI