AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्यावर भारताकडून हल्ला होण्याची शक्यता, पाकिस्तानची यूएनकडे तक्रार

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरमधील पुलवामाध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, असा इशारा यानंतर भारताने दिला. भारताच्या इशाऱ्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आता नवीन सोंग आणणं सुरु केलंय. त्यामुळे भारत आपल्याला सोडणार नाही याची जाणीव पाकिस्तानला झाल्याचं बोललं […]

आमच्यावर भारताकडून हल्ला होण्याची शक्यता, पाकिस्तानची यूएनकडे तक्रार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरमधील पुलवामाध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, असा इशारा यानंतर भारताने दिला. भारताच्या इशाऱ्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आता नवीन सोंग आणणं सुरु केलंय. त्यामुळे भारत आपल्याला सोडणार नाही याची जाणीव पाकिस्तानला झाल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे अमेरिका, रशिया, फ्रान्स या जगातील सर्व प्रमुख देशांसह  50 पेक्षा जास्त देशांनी भारताला पाठिंबा दिलाय. त्यामुळे एकटा पडलेल्या पाकिस्तानने खोटेपणा सुरु केलाय.

पाकिस्तानचं पहिलं नाटक

जम्मू काश्मीरमधील पुलवामा (Pulwama attack) इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर छी थू होत आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. “माझं वक्तव्य भारत सरकारसाठी आहे. भारत सरकारने कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तान सरकारवर आरोप केले. आम्ही स्थैर्याकडे जात असताना, हल्ला कशाला करु. पुरावे द्या कारवाईची आम्ही हमी देतो. हल्ला करुन पाकिस्तानला काय मिळेल? काश्मीरमधील हल्ल्यांना दोष देण्यापेक्षा तो प्रश्न सोडवू”, असं भावनिक आवाहन इम्रान खान यांनी केलं.

पाकिस्तानचं दुसरं नाटक

इम्रान खान यांची पत्रकार परिषद होण्याआधी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली. आमच्या भागात उद्भवलेल्या परिस्थितीकडे आम्हाला तातडीने लक्ष वेधायचं आहे. आमच्याविरुद्ध भारताकडून मिलिट्री पॉवरचा वापर केला जाऊ शकतो, अशी तक्रार पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाच्या सचिवांकडे केली. त्यामुळे भारत आपल्याला सोडणार नाही याची जाणीव झालेल्या पाकिस्तानने आता सज्जनपणाचा आव आणणं सुरु केलंय.

पाकिस्तानला इराणचाही इशारा

जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे. आमच्या शहिदांच्या रक्ताच्या एका एका थेंबाचा बदला घेतला जाईल, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिलाय. तर पाकिस्तानच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या इराणनेही पाकिस्तानला कठोर शब्दात असाच इशारा दिलाय. त्यामुळे पाकिस्तान आता कोंडीत सापडला आहे.

एका बाजूला भारत, तर दुसरीकडून इराणचाही पाकिस्तानला बदला घेण्याचा इशारा

इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील खश-झहेदान भागात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये इराणच्या 23 सैनिकांचा मृत्यू झाला. इराणमध्येही पाकिस्तानविरोधात तीव्र रोष आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे मेजर जनरल मोहम्मद अल जाफरी यांनी पाकिस्तानला तीव्र शब्दात फटकारत आमच्या सैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, असा इशारा दिलाय.

पाकिस्तानने दहशतवाद संपवण्यासाठी आता तरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. पाकिस्तानला जमत नसेल तर आम्ही यासाठी पुढाकार घेऊन. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आम्हाला याचा पूर्ण अधिकार आहे, असं म्हणत मोहम्मद अल जाफरी यांनी या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा इशारा दिला.

पाहा व्हिडीओ :

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.