Pakistan On Putin India Visit : पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर पाकिस्तान टेन्शनमध्ये, पण त्यांचा शेजारी देश मात्र खूप खुश, कारण…
Pakistan On Putin India Visit : पुतिन यांच्या दौऱ्यात अप्रत्यक्षपणे भारत-रशियाने मिळून पाकिस्तानचा मोठा गेम केला आहे. पुतिन यांची भूमिका आश्चर्यकारक वाटली असेल. पाकिस्तान या दौऱ्यामुळे अस्वस्थ आहे. पण पाकिस्तानचा शेजारी देश मात्र खूप खुश आहे.

रशियाचे राष्ट प्रमुख व्लादिमीर पुतिन चार वर्षांनी भारत दौऱ्यावर आले होते. दिल्लीत पुतिन यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं. पण या दौऱ्यामुळे सर्वात जास्त अस्वस्थ पाकिस्तान होता. त्यांना मुख्य टेन्शन होतं, पुतिन भारताला आणखी कोणती घातक शस्त्र देणार. S-400 ची कमाल त्यांनी पाहिलीच आहे. त्यामुळे पाकिस्तान पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे टेन्शनमध्ये होता. पण पाकिस्तानचा शेजारी देश मात्र पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे आनंदी होता. तो देश आहे, अफगाणिस्तान. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आहे. आजही जगातील अनेक देश तालिबानला मान्यता द्यायला तयार नाहीयत. पण रशिया आणि भारताच्या बदललेल्या रणनितीने अफगाणिस्तानचा आनंद कैकपटीने वाढवला. समजून घेऊया कसं ते.
दिल्लीत भारतीय मीडियाशी बोलताना पुतिन यांनी तालिबानबद्दल हैराण करणारा पण स्पष्ट संदेश दिला. “तालिबानचं संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण आहे, हे सत्य आहे आणि स्वीकारावं लागेल” असं पुतिन म्हणाले. तालिबानच कौतुक करताना पुतिन यांनी दावा केला की, “ते दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत आहेत. ISIS आणि अन्य दहशतवादी नेटवर्कवर त्यांचा प्रहार सुरु आहे. अफीमच उत्पाद बऱ्याच प्रमाणात कमी झालं आहे”
भारत-रशियामुळे तिसऱ्या देशाचा काय फायदा?
दिल्लीत झालेल्या 23 व्या भारत-रशिया शिखर सम्मेलनात दोन्ही देशांमध्ये अफगाणिस्ताबद्दल अभूतपूर्व समन्वय दिसून आला. “दहशतवादाविरुद्ध समावेशक आणि प्रभावी रणनिती बनली पाहिजे. ISISK सारख्या दहशतवादी संघटनेविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे. मानवी सहाय्यता कुठल्याही अडथळ्याशिवाय अफगाणिस्तानात पोहोचली पाहिजे. सुरक्षा परिषदांमध्ये नियमित संपर्क असला पाहिजे” असं संयुक्त स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. हा संयुक्त आवाज तालिबानसाठी कुठल्या समर्थन पत्रापेक्षा कमी नाही तालिबान आनंदी यासाठी आहे, कारण रशियाची औपचारिक मान्यता त्यांना आंतरराष्ट्रीय वैधता देते. भारत-रशियाच्या संयुक्त समर्थनामुळे तालिबानला राजकीय वजन प्राप्त होतं.
पाकिस्तानला भिती कसली?
तालिबानवरील रशिया-भारताच्या वाढत्या प्रभावामुळे पाकिस्तानच रणनितीक महत्व कमी होतं. अफगाणिस्तानवरील पाकिस्तानची पकड सुटत चालली आहे. ISIS-K विरुद्ध भारत-रशियाच्या संयुक्त रणनितीमुळे पाकिस्तानची बाजू कमकुवत होते.
