डॉक्टरांकडून मृत घोषित, पत्नीने पतीच्या हाताला स्पर्श करताच हृदयाची धडधड सुरू; डॉक्टरही अचंबित

त्याचवेळी रयानच्या काही चाचण्या करण्यात आल्या. तेव्हा त्यांची न्यूरॉलॉजिकल डेथ झाली नसल्याचं दिसून आलं. त्यांच्या मेंदूला रक्त पुरवठा होत असल्याचं स्पष्ट झालं. हे रिपोर्ट आल्यानंतर मी रयानच्या हाताला स्पर्श केला.

डॉक्टरांकडून मृत घोषित, पत्नीने पतीच्या हाताला स्पर्श करताच हृदयाची धडधड सुरू; डॉक्टरही अचंबित
डॉक्टरांकडून मृत घोषित, पत्नीने पतीच्या हाताला स्पर्श करताच हृदयाची धडधड सुरू; डॉक्टरही अचंबितImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 1:46 PM

वॉशिंग्टन: त्याला डॉक्टरांनी अखेर मृत (dead husband) घोषित केलं होतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे ऑर्गन डोनेट करण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसानंतर ऑर्गन काढण्यात येणार होते. ऑर्गन काढण्याची तयारीही झाली. तेवढ्यात या व्यक्तिचे पाय थोडे हलले. हे पाहून त्याच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आशेचा किरण दिसतोय, काही तरी वेगळं घडू शकतं, असं तिला वाटलं. नवरा वाचण्याची उमेद जागी झाली. त्यानंतर तिने (Wife) तिच्या मनातील भावना त्याच्यासमोर व्यक्त करण्यास सुरुवात केली. या भावना व्यक्त करता करता नवऱ्याच्या (Ryan) हाताला अलगद स्पर्श केला अन् वीज चमकावी तसं झालं. पत्नीच्या हाताचा स्पर्श होताच त्याच्या हृदयाची धडधड सुरू झाली अन् अचानक घडलेल्या या घटनेने डॉक्टरांचीही तारांबळ उडाली. डॉक्टरांनी लागलीच चाचण्या सुरू केल्या. तो जिवंत आहे. पण सध्या तो कोमात आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

रयान मार्लो असं या जीवनमरणाचा संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्याला तीन मुलं आहेत. तो अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथे राहतो. प्रकृती बिघडल्याने त्याला गेल्या महिन्यात एमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आलं होतं. त्याला listeria हा आजार झाला आहे. त्याच्या मेंदूला सूज आल्यानंतर तो कोमात गेला होता. 27 ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं.

याबाबत रयानची पत्नी मेघनने मीडियाशी संवाद साधताना या घटनेची माहिती दिली. डॉक्टर बाहेर आले आणि मला म्हणाले तुमच्या पतीचं निधन झालंय. त्यांची न्यूरॉलॉजिकल डेथ झालीय. त्यांनी चार्टवर मृत्यूची तारीखही लिहिली होती. मी डॉक्टरांना सांगितलं की, माझे पती हे ऑर्गन डोनर आहेत. त्यामुळे त्यांचे ऑर्गन आम्हाला डोनेट करायचे आहेत. त्यानंतर डॉक्टरांनी ऑर्गन डोनेट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं, मेघन म्हणाली.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर मी घरी निघून गेले. दोन दिवसानंतर डॉक्टरांचा फोन आला. डॉक्टर म्हणाले, रयान हे ट्रॉमॅटिक ब्रेन डॅमेजने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची तारीख 27 ऑगस्ट ऐवजी 30 ऑगस्ट करण्यात आली आहे, असं मेघन म्हणाली. डॉक्टरांकडून एक चूक झाली होती. रयानचा मृत्यू झाला नव्हता. त्यांची न्यूरॉलॉजिकल डेथ झाली नव्हती. मी डॉक्टरांना याचा अर्थ विचारला होता, असं त्या म्हणाल्या.

रयान वास्तविक ट्रॉमॅटिक ब्रेन स्टेम इंज्युरीने ग्रस्त होते. ते बेसिकली ब्रेन डेड झाले होते, असं मला सांगण्यात आलं, असं त्या म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी रयानच्या लाईफ स्पोर्ट हटवून त्यांचे ऑर्गन्स काढण्यात येणार होते.

मात्र, डॉक्टरांच्या सर्जरीपूर्वीच रयानजवळ मेघनचा भाचा गेला. तिथे मुलांशी खेळताना त्यांनी रयानचा व्हिडिओ सुरू केला. त्यानंतर अचानक रयानच्या पायाच्या हालचाली सुरू झाल्या. जेव्हा मला हे सांगण्यात आलं. तेव्हा मला रडूच कोसळलं. ब्रेन डेडच्या अवस्थेत असं होतं हे मला माहीत होतं. त्यानंतर मी रयानला बघण्यासाठी गेले.

त्यावेळी त्यांच्या देहाकडे पाहून मी मनातील गोष्टी त्यांना भडाभडा सांगायला सुरुवात केली. तुम्हाला वेड्यासारखा संघर्ष करायचा आहे. कारण मी आता ऑर्गन डोनेट करण्याची प्रक्रिया थांबवायला निघाले आहे. त्याऐवजी काही टेस्ट करायला सांगणार आहे, असं मी रयानच्या देहाकडे पाहून बडबडत होते.

त्याचवेळी रयानच्या काही चाचण्या करण्यात आल्या. तेव्हा त्यांची न्यूरॉलॉजिकल डेथ झाली नसल्याचं दिसून आलं. त्यांच्या मेंदूला रक्त पुरवठा होत असल्याचं स्पष्ट झालं. हे रिपोर्ट आल्यानंतर मी रयानच्या हाताला स्पर्श केला. त्याच्याशी बोलू लागले. तेवढ्यात रयानच्या हृदयाची धडधड वाढली. त्यावेळी डॉक्टर म्हणाले, रयान ब्रेन डेड नाही. पण तो कोमात आहे.

माझे पती अत्यंत क्रिटिकल अवस्थेत आहेत. ते अजून रिस्पाँड करत नाहीत. त्यांनी अजून डोळे उघडलेले नाहीत, असं त्या म्हणाल्या. रयान अजून रुग्णालयात असून ते कोमात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.