महिलेला वाटलं कोरोना झाला पण समोर आला भयंकर आजार, कापावे लागले दोन्ही पाय

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Feb 12, 2021 | 9:58 AM

ब्रिटनमधील एका महिलेला तिला कोरोनाने झाल्याचं वाटलं पण एका भयंकर आजाराने आता तिच्यावर पाय गमावण्याची वेळ आली आहे.

महिलेला वाटलं कोरोना झाला पण समोर आला भयंकर आजार, कापावे लागले दोन्ही पाय

Follow us on

ब्रिटेन : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) जगभरात भीषण परिस्थिती आणली. अशीच परिस्थिती ब्रिटेनमध्येही (Britain) में होती. आताही इथे कोरोनामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण इथे या कोरोनामुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रिटनमधील एका महिलेला तिला कोरोनाने झाल्याचं वाटलं पण एका भयंकर आजाराने आता तिच्यावर पाय गमावण्याची वेळ आली आहे. खरंतर, खूप ताप आणि डोकेदुखीमुळे चेर लिटिलने (Cher Little) कोरोना चाचणी केली. पण 46 वर्षीय चेरच्या चेहऱ्यावर पुरळ उठू लागले आणि तिची त्वचा काळी पडण्यास सुरुवात झाली. यावेळी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी तिला ‘मेनिंगोकोकल सेप्टीसीमिया’ (Meningococcal Septicaemia) झाला असल्याचं सांगितलं आहे. (woman lost both legs due to Meningococcal Septicaemia and coronavirus )

सगळ्यात धक्कादायक म्हणजे चेरचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिचे दोन्हीही पाय कापावे लागले आहेत. चेरचा आजार गंभीर आहे. या आजाराने तिला पूर्णपणे वेढलं होतं. संपूर्ण शरीरावर फोड आले होते आणि त्यातून रक्त येत होतं. गंभीर म्हणजे रुग्णालयात पोहोचल्यानंतर 15 मिनिटांतच ती कोमामध्ये गेली. तिच्या अनेक अवयवांनी काम करणं थांबवलं. तिला वाचवण्यासाठी डॉक्टर अथक प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोमातून बाहेर येताच झाला कोरोना

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चेर या गंभीर आजारापासून वाचण्याची फक्त 20 टक्के शक्यता आहे. प्रत्येक वेळी डॉक्टर तिला कोमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ती प्रतिक्रिया देत नाही. अखेर तीन आठवड्यांनंतर चेर कोमातून बाहेर आली पण आता तिला कोरोनाची लागण झाली आहे.

हात वाचले पण पायांना कापावं लागलं

चेर कोमामध्ये असल्यामुळे तिच्या शरीरात रक्ताचा प्रवाह कमी झाला आहे आणि यामुळे तिच्या हाता-पायांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पण अथक प्रयत्नांनी तिचे हात वाचवले पण पाया कापावे लागले. (woman lost both legs due to Meningococcal Septicaemia and coronavirus )

संबंधित बातम्या – 

गर्भावस्थेदरम्यान डोकेदुखीची समस्या उद्भवतेय? मग, ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा!

Menopause | मोनोपॉजची लक्षणं काय? कमी वयात मोनोपॉज ठरु शकतो धोकादायक!

Health | डोळ्यांनाही होऊ शकतो ‘पॅरालिसिस’! जाणून घ्या या मागची कारणे, लक्षणे व उपाय…

(woman lost both legs due to Meningococcal Septicaemia and coronavirus )

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI