AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा मोठा डाव, पाकिस्तानने स्वत:चाच फाडला बुरखा, शेवटी भर बैठकीत पाकचा थयथयाट, थेट..

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. याच संधीचा फायदा साधून पाकिस्तानने अमेरिकेसोबत जवळीकता वाढवली. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती होती. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला पहलगामवर केला.

भारताचा मोठा डाव, पाकिस्तानने स्वत:चाच फाडला बुरखा, शेवटी भर बैठकीत पाकचा थयथयाट, थेट..
UNGA
| Updated on: Sep 28, 2025 | 2:47 PM
Share

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) भारताचा दबदबा बघायला मिळाला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेतच पुढाकार घेऊन थेट ब्रिक्स देशांची बैठक घेतली. यासोबतच रशिया आणि भारत यांच्यातील खास मैत्री देखील जगाला बघायला मिळाले. रशियाने अमेरिकेच्या नाकावर टिच्चू भारताचे काैतुक करत म्हटले की, भारताने कोणासोबत भागीदारी करायची हे फक्त भारतच ठरवतो. एस. जयशंकर यांनी यादरम्यान पाकिस्तानचे थेट नाव न घेता मोठा टोला लगावत पाकिस्तानवर जोरदार टीका देखील केली. पाकिस्तानच्या दहशतवादावर त्यांनी भाष्य केले. स्वातंत्र्यापासून भारताला दहशतवादाचा मोठा धोका आहे, असे त्यांनी आपला भाषणात स्पष्ट म्हटले.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य स्रोत त्याच देशाचा आहे. मुळात म्हणजे भारताला स्वातंत्र्यापासून दहशतवादाचा मोठा धोका आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या प्रतिनिधीने नाव घेऊन भारतावर थेट टीका केल्याचे बघायला मिळाले. मात्र, एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव घेतले नव्हते. भारत हा पाकिस्तानला बदनाम करत असल्याचे पाकिस्तानच्या प्रतिनिधीने म्हटले.

यादरम्यान भारताने पाकिस्तानच्या आरोपांवर उत्तर देत म्हटले की, भारताने कोणाचेही नाव घेतले नाही. एक शेजारी देश सीमेपलीकडे दहशतवादाच्या आपल्या दीर्घकालीन पद्धतीची कबुली देत ​​आहे हे यावरून स्पष्ट होतंय. भारताच्या स्थायी मिशनचे सचिव रेंटला श्रीनिवास यांनी म्हटले, पाकिस्तानची विश्वासार्हता बोलते आणि त्यांच्या दहशतवादाचा परिणाम शेजारील देशांवरच नाही तर जगभर होतो.

भारताकडून पाकिस्तानच्या दहशतवादाचा निषेध करण्यात आला. मागील काही दिवसांपासून भारत दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला कोडींत पकडत आहे. पाकिस्तानसोबत वाढलेली अमेरिकेची जवळीकता आणि टॅरिफच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दाैरा रद्द केला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने पाकिस्तानविरोधात मोठा डाव टाकला आणि पाकिस्तान त्यात फसला. भारताने पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादावर टीका केली होती. मात्र, पाकिस्तान त्यामध्ये फसला आणि त्यांनी भारताला उत्तर दिल्याने त्यांचा बुरखा फाडला गेल्याचे बघायला मिळाले.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या