आताचे सर्वात श्रीमंत, पण ‘जुळलं’ तेव्हा किती पैसे होते? गौतम अदानींची इन्स्पिरेशनल LOVE STORY!

प्रीती अदानी आणि गौतम अदानी यांच्या लग्नाला आता 36 वर्षे पूर्ण झालीत. दोघांमध्ये अजूनही तेवढंच प्रेम आहे.

आताचे सर्वात श्रीमंत, पण 'जुळलं' तेव्हा किती पैसे होते? गौतम अदानींची इन्स्पिरेशनल LOVE STORY!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 2:39 PM

जगातील सर्वात श्रीमंतांपैकी (Richest man) एक म्हणजे भारताचे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani). त्यांच्या बिझनेस (Business) सेन्सची चर्चा सध्या जगभरात आहे. त्यांची एकूण संपत्ती 13 हजार कोटी डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे 10 लाख कोटी रुपये एवढी आहे. गौतम अदानी यांनी मागील 2 वर्षांत खूप प्रगती केली आहे. अनेक उद्योगपतींना त्यांनी मागे टाकलंय.

पण एवढ्या मोठ्या संपत्तीचे मालक असूनही गौतम अदानींचं राहणीमान अगदी साधं आहे. त्यांची जीवनशैलीदेखील सामान्य आहे. त्याहीपेक्षा जास्त साधी त्यांची लव्हस्टोरी आहे.

आर एन भास्कर यांच्या Gautam Adani: Reimaginning Business in India या पुस्तकात गौतम अदानी यांच्या लव्ह स्टोरीबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे.

पुस्तकात लिहिल्यप्रमाणे, गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांचं लग्न अगदी सामान्य अरेंज मॅरेजप्रमाणे झालं. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत प्रीती यांना गौतम अदानी आवडले नव्हते. एवढच नाही तर त्यांचं ग्रॅज्युएशनही पूर्ण झालं नव्हतं.

तर प्रीती अदानी डेंटिस्टचं शिक्षण घेत होत्या. त्यामुळे गौतम अदानी आपल्यासाठी योग्य व्यक्ती नाही, असं प्रीती यांना वाटलं होतं…

प्रीती यांचे पती सेवंतीलाल यांनी त्यांना समजावून सांगतिलं. अशा वेळी माणसाची पात्रता जोखावी, असं म्हटलं होतं. त्यानंतर गौतम अदानी यांच्या भेटीसाठी प्रीती अदानी तयार झाल्या. त्यानंतर दोघांच्या भेटी-गाठी झाल्या आणि लग्नासाठी दोघेही तयार झाले.

1 मे 1986 रोजी प्रीती आणि गौतम अदानी यांचं लग्न झालं. लग्नानंतर दोघांसाठीही आव्हानात्मक काळ सुरु झाला. उद्योग वाढीच्या निमित्ताने गौतम अदानींना अनेकदा बाहेरगावी जावं लागत असे.

पण वेळ मिळत होता, तेव्हा ते पत्नी आणि कुटुंबासोबत राहत असत. आरएन भास्कर यांच्या पुस्तकातील उल्लेखानुसार, गौतम अदानी व्यावसायिक कामं संपवूनच घरासाठी वेळ देत असत. हे कसब त्यांच्याकडे होतं.

प्रीती अदानी आणि गौतम अदानी यांच्या लग्नाला आता 36 वर्षे पूर्ण झालीत. दोघांमध्ये अजूनही तेवढंच प्रेम आहे. गौतम अदानींच्या 60 व्या वाढदिवशी प्रीती यांनी गौतमजींचा एक जुना फोटो शएअर केला. त्यावर त्यांनी लिहिलंय….

36 वर्षांआधीच मी माझं करिअर सोडून दिलं. गौतम अदानींसोबत नवा प्रवास सुरु केला. आज मागे वळून पाहताना, या व्यक्तीबद्दल खूप अभिमान आणि आदर वाटतो. आज त्यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचं आरोग्यासाठी तसेच त्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करते…

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.