AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलियन्स आले ? उंची इतकी की… NASAच्या इशाऱ्याने खळबळ

Science News : NASA ने 20 KM लांबीचा एक इंटरस्टेलर पिंड 3I/ATLAS शोधला आहे. शास्त्रज्ञांना संशय आहे की ते परग्रही तंत्रज्ञान असू शकते. हार्वर्डच्या शास्त्रज्ञांनी ते मानवतेसाठी संभाव्य धोका असल्याचे म्हटले आहे.

एलियन्स आले ? उंची इतकी की... NASAच्या इशाऱ्याने खळबळ
Image Credit source: social media
| Updated on: Jul 19, 2025 | 2:06 PM
Share

3I/ATLAS News : या ब्रह्मांडात आपण खरेच एकटे आहोत की कोणी लपून-छपून आपल्याला बघतंय ? अलिकडेच अवकाश शास्त्रज्ञांनी 3I/ATLAS या नवीन इंटरस्टेलर ऑब्जेक्टचा शोध लावला आहे. या शोधामुळे विज्ञानाच्या जगात खळबळ उडाली आहे. पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हार्वर्ड विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ एव्ही लोएब म्हणतात की हे कदाचित एक सामान्य उल्कापिंड नसून एक एलियन तंत्रज्ञान आहे, जी जाणूनबुजून आपल्या सौर मंडळाकडे पाठवण्यात आली आहे. ही केवळ खगोलभौतिक बाब नाही तर ती खरी सिद्ध झाली तर ती मानवतेसाठी एक अज्ञात धोका निर्माण करू शकते.

3I/ATLAS चा शोध NASA च्या ATLAS टेलीस्कोपने लावण्यात आला हे आपल्या सौरमालेत प्रवेश करणारा तिसरा इंटरस्टेलर पिंड आहे. परंतु तो आकाराने इतका प्रचंड आहे की तो आतापर्यंतचा सर्वात मोठा बाह्य पिंड मानला जात आहे. ते सुमारे 20 किलोमीटर लांब आहे. लोएबच्या मते, या पिंडभोवती वायू आणि धुळीचा जाड थर आहे ज्यामुळे त्याची रचना संशयास्पद बनते. तो म्हणतो की त्याची दिशा, वेग आणि रचना कोणत्याही नैसर्गिक शरीरासारखी नाही. आणि पृथ्वी किंवा सूर्याजवळील एखाद्या प्रगत परग्रही संस्कृतीने पाठवले असण्याती शक्यता त्याने बोलून दाखवली.

“डार्क फॉरेस्ट थिअरी”: ब्रह्मांडातील सर्वात भयानक कल्पना ?

लोएब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या घटनेचा संबंध ‘डार्क फॉरेस्ट हायपोथेसिस’शी जोडला आहे. या सिद्धांतानुसार, विश्वात असंख्य परग्रही संस्कृती अस्तित्वात आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात विनाश टाळण्यासाठी त्या एकमेकांपासून लपून असतात. जर 3I/ATLAS खरोखरच अशा संस्कृतीने पाठवलेला सिग्नल असेल, तर तो शांतताप्रिय ग्रह पृथ्वीसाठी एक इशारा असू शकतो. जर हा सिद्धांत खरा ठरला तर मानवजातीसाठी गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा लोएब यांनी दिला आहे.

शास्त्रज्ञांमध्ये मतभेद पण..

एकीकडे लोएब यांना ही वस्तू परग्रही तंत्रज्ञानाची असल्याचे वाटत असले तरी, अनेक शास्त्रज्ञ या कल्पनेशी सहमत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की ही फक्त एक जुनी अवकाशातील वस्तू असू शकते जी दूरच्या ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर फेकली गेली आहे.पण त्याचा सर्व डेटा येईपर्यंत कोणतीही शक्यता नाकारणे खूप घाईचे ठरू शकते, असे लोएब यांचे म्हणणे आहे. 3I/ATLAS डिसेंबरमध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळून सुमारे 270 दशलक्ष किमी अंतरावरून जाईल, आणि त्या काळात शास्त्रज्ञ त्याचे अधिक बारकाईने निरीक्षण करतील.

एलियनची आपल्यावर नजर आहे का ?

3I/ATLAS बद्दलची चर्चा भयावह आहे कारण तो एकटा नाही. यापूर्वी, लोएबने 1I/Oumuamua ला देखील एलियन अंतराळयान म्हणून वर्णन केले होते. ते सिद्ध होऊ शकले नसले तरीही, परंतु आता अशा वस्तूंचे वारंवार आगमन हे कोणीतरी आपली परीक्षा घेत असल्याचे लक्षण असू शकते. ही पाळत ठेवण्याची मोहिम आहे का? आपण एखाद्या वैश्विक सर्वेक्षणाचा भाग झालो आहोत का? की पृथ्वी आता पुढील ‘संपर्का’साठी तयारी करत आहे? जर हा दावा सिद्ध झाला तर तो इतिहासातील सर्वात मोठा शोध किंवा सर्वात मोठा धोका असेल. शास्त्रज्ञ आता बारकाईने पाहत आहेत, कारण आपण विश्वात एकटे आहोत की नाही हे 3I/ATLAS चे सत्य हे ठरवेल… आणि जर तसं नसेल, तर दूरून कोणी, आपल्याकडे पाहत आहे का, लक्ष ठेवून आहे का ? हा प्रश्न उरतोच

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.