टेक ऑफपासून लँडिंग पर्यंत… विमानाचं उड्डाण कसं होतं?; थोडी चूक कशी देते दुर्घटनेला आमंत्रण?
विमानाचे उड्डाण, टेकऑफ आणि लँडिंग यांच्या विज्ञानाबद्दल माहिती दिली आहे. मानवी चूक, तांत्रिक दोष आणि हवामान अशा विमान अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा समावेश आहे. दुर्घटना टाळण्यासाठी घेतले जाणारे उपाय आणि सुरक्षितता उपाययोजना यावरही प्रकाश टाकला आहे.

अजरबैजान येथील विमान अपघाताचे फोटो व्हायरल झाले आणि सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. हे होत नाही तोच दक्षिण कोरियातील विमान अपघाताची बातमी येऊन धडकली. थायलंडहून दक्षिण कोरियासाठी विमानाने उड्डाण घेणार होतं. सकाळीच रनवेवरून उड्डाण घेण्यापूर्वी हे विमान क्रॅश झालं. त्यामुळे विमानात आग लागली. या आगीत 120 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तर अजरबैजान येथील विमान अपघातात 38 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांवर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या दोन्ही विमान दुर्घटना पाहिल्या तर एका छोट्या चुकीमुळे किती तरी लोकांचा जीव जाऊ शकतो हे स्पष्ट झालंय. पण मग मात्र, प्रश्न हा निर्माण होतो...
