AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही फोन टेबलवर कसा ठेवता…उपडा कि सरळ? ९० टक्के भारतीयांना माहिती नाही

स्मार्टफोनशिवाय सध्या कोणाचे पान हलत नाही. सतत स्मार्टफोनवर आपली नजर खिळलेली असते. त्यामुळे आता आपण इतके आहारी गेलो आहोत की इंटरनेट नसेल तर आपल्याला गुदमरल्यासारखे वाटते.

तुम्ही फोन टेबलवर कसा ठेवता...उपडा कि सरळ? ९० टक्के भारतीयांना माहिती नाही
Smart phone
| Updated on: Dec 29, 2025 | 7:27 PM
Share

स्मार्टफोन आपल्या जीवनाचा हिस्सा झाला आहे. स्मार्टफोन शिवाय आपले पान हलत नाही. कामात, मीटींगमध्ये, जेवणाच्या टेबलवर वा मित्रांच्या सोबत बसताना, फोन नेहमीच सोबत टेबलवर ठेवला जातो. परंतू खूप कमी लोक याकडे ध्यान देत नाहीत की फोनची स्क्रीनची बाजू फोन टेबलवर ठेवताना वर असावी की खाली ? ही किरकोळ वाटणारी बाब वास्तविक तुमची सवय, ध्यान आणि डिजिटल हेल्थवर परिणाम करते. फोनची स्क्रीन वरती ठेवणे आजच्या काळात एक सर्वसाधारण चूक बनली आहे. ज्यामुळे अनेकदा नुकसान होत असते.

स्क्रीनवरच्या बाजूला म्हणजे खाजगीपणा होतो उघड

जेव्हा फोन टेबलवर ठेवताना स्क्रीनवर असते तेव्हा न जाणता आपली खाजगी जीवनाची ती खिडकी बनते. कोणत्या बँकेतून आलेला संदेश, , OTP, निजी चॅट वा ऑफिसशी संबंधित नोटीफिकेशन, सर्वकाही तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांच्या नजरेत येऊ शकतो. अनेकदा आपल्या स्वत:ला कळत नाही की आपल्या स्क्रीनवर काय फ्लॅश झाले आणि कोणी पाहिले. स्क्रीन खाली म्हणजे मोबाईल फोन उपडा ठेवल्याने हा धोका समाप्त होतो. आजकल डिजिटल प्रायव्हसी सर्वात मोठी चिंता बनली असताना ही सवय तुमची खाजगी माहिती कोणत्याही मेहनतीविना सुरक्षित राखते.

नोटिफिकेशनचे महाजाल, लक्ष विचलित होणे –

फोनची सर्वात मोठी ताकद त्याचे नोटिफिकेश सिस्टीम असते. आणि ती फोनची सर्वात मोठी कमजोरी देखील बनली आहे. स्क्रीन वरच्या बाजूला असेल तर प्रत्येक व्हायब्रेशन वा लाईटला तुमची नजर तिकडे जाते. जर तुम्हाला फोन उचलायचा नसला तरी परंतू तुमचा मेंदूचे तिकडे लक्ष भटकते. स्क्रीन खाली ठेवल्याने हे दृश्य आकर्षण संपून जाते. यामुळे तुम्ही तुमचे काम, बातचीत वा अभ्यासावर नीट लक्ष केंद्रीत करु शकता. ही सवय तुम्हाला शिकवते की प्रत्येक अलर्ट गरजेचा नसतो.

मानसिक शांतीसाठी छोटी परंतू परिणामकारक सवय

जेव्हा फोन समोर असतो तेव्हा वारंवार स्क्रीन ब्राईट झाल्याने मेंदू सतत अलर्ट मोडमध्ये रहातो. यामुळे थकवा आणि बेचैनी वाढते. स्क्रीन उपडी ठेवल्याने मेंदुला संकेत मिळतो की आता फोन प्राथमिकता नाही. त्यामुळे तुम्ही अधिक रिलॅक्स अनुभवता. समोरच्या माहौलशी चांगल्या प्रकारे जुळवून घेता. तुम्ही कुटुंबासोबत असाल किंवा एकटे ही सवय तुम्हाला क्षणात जगायला शिकवते.

स्क्रीन आणि कॅमरा सुरक्षित

फोनचा डिस्प्ले आणि कॅमेरा सर्वात नाजूक आणि महागडा भाग असतो. स्क्रीनवरच्या दिशेने असल्याने पाणी किंवा चहा-कॉफीचा वा जेवणाचे कण स्क्रीनवर पडण्याचा धोका असतो. तसेच कॅमेऱ्याची लेन्स टेबला घासली जात असल्याने हळूहळू लेन्स खराब होऊ शकते. स्क्रीन खालच्या दिशेने ठेवल्याने हे दोन्ही भाग सुरक्षित रहातात. तसेच फोनच घसरून पडण्याची धोकाही कमी होतो. टेबलचा पृष्टभाग निसरडा आणि गुळगुळीत असतो.

बॅटरी आणि डोळ्यांनाही आराम –

प्रत्येक वेळी स्क्रीन ऑन होणे आणि फोन अनलॉक केल्याने बॅटरी हळूहळू संपते. जेव्हा स्क्रीन खाली असेल तेव्हा नोटीफिकेशन तुम्हाला वारंवार फोन उचलण्यासाठी मजबूर करत नाहीत. यामुळे स्क्रीन टाईम आपोआप कमी होतो. त्यामुळे बॅटरी जास्त चालते. डोळ्यांना कमी ट्रेस झेलावा लागतो. त्यामुळे फोन आणि युजर दोघांचा फायदा होतो.

फोनसोबत संतुलित नाते

फोनची स्क्रीन खालच्या बाजूला ठेवून तुम्ही हे निश्चित करता की फोन तुमच्या जीवनाला कंट्रोल करत नाही. ही सवय दुसऱ्यांना हे जाणवू देतात की तुम्ही त्यांच्या सोबत पूर्णपणे उपस्थित आहात. हळूहळू तुम्ही फोनच्या ऐवजी स्वत:वर आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करता. हेच संतुलन एका हेल्दी डिजिटल लाईफचा पाया आहे.जेथे टेक्नॉलॉजी तुमची मदत करते आणि तुम्हाला बांधत नाही.

शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर.
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.